Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

Pav Bhaji Recipe : सकाळच्या नाश्ता रंगतदार करायचा असेल तर पावभाजीचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरु शकतो. मुंबईचा हा फेमस स्ट्रीट फूड फार सोप्या पद्धतीत घरीच तयार करता येतो. याच्या मदतीने तुम्ही मुलांना अनेक भाज्या खायला घालू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 12:13 PM
Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • पावभाजी म्हणजे मुंबईकरांचा फेव्हरेट नाश्ता.
  • भाज्यांपासून बनवलेली चटपटीत भाजी आणि गरमा गरमा पाव यांचा संगम पदार्थाला खास बनवतो.
  • हा एक फेमस स्ट्रीट फूड असून खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही याला घरी तयार करु शकता.
मुंबईच्या रस्त्यांपासून ते घराघरांतील स्वयंपाकघरापर्यंत लोकप्रिय असलेली पावभाजी ही भारतातील सर्वाधिक आवडती स्ट्रीट फूड डिश मानली जाते. पावभाजीची खासियत म्हणजे ती चविष्ट असण्यासोबतच पौष्टिकही असते. बटाटा, फ्लॉवर, मटार, गाजर, ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांचा वापर केल्यामुळे या पदार्थात भरपूर पोषक घटक मिळतात.

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

घरी पावभाजी तयार करताना आपल्या आवडीनुसार तिखटपणा, मसाले आणि भाज्यांचे प्रमाण बदलता येते. त्यामुळे ही डिश लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पाहुण्यांच्या मेजवानीसाठी किंवा खास वीकेंड डिनरसाठी पावभाजी हा उत्तम पर्याय ठरतो. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

भाजीसाठी:

  • 3 बटाटे उकडून मॅश केलेले
  • 1 कप फ्लॉवर बारीक चिरलेला
  • 1/2 कप हिरवे मटार
  • 1 गाजर बारीक चिरलेले
  • 1 ढोबळी मिरची बारीक चिरलेली
  • 2 कांदे बारीक चिरलेले
  • 3 टोमॅटो बारीक चिरलेले
  • 2 टेबलस्पून बटर
  • 2 टीस्पून पावभाजी मसाला
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून हळद
  • मीठ चवीनुसार
  • 2 टेबलस्पून कोथिंबीर
  • आवश्यकतेनुसार पाणी
Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ

कृती

  • फ्लॉवर, मटार आणि गाजर थोडे पाण्यात शिजवून घ्या. शिजल्यानंतर बटाट्यासोबत मॅश करून बाजूला ठेवा.
  • कढईत बटर गरम करून त्यात चिरलेला कांदा परता. कांदा हलका सोनेरी झाल्यावर ढोबळी मिरची घालून 2-3 मिनिटे शिजवा.
  •  आता टोमॅटो घालून ते पूर्णपणे मऊ होईपर्यंत परता. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला घाला.
  • तयार केलेल्या मसाल्यात मॅश केलेल्या भाज्या घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजीला इच्छित घट्टपणा द्या. मीठ घालून 10-15 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • भाजी शिजल्यानंतर वरून थोडे बटर आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा.
  • तव्यावर बटर गरम करून त्यात थोडा पावभाजी मसाला भुरभुरा. पाव मधून कापून दोन्ही बाजूंनी हलके कुरकुरीत भाजून घ्या. गरमागरम भाजीसोबत कांदा, लिंबू आणि लोण्याचा तुकडा घालून सर्व्ह करा.
  • पावभाजीची चव अधिक रेस्टॉरंटसारखी हवी असल्यास शेवटी थोडे अतिरिक्त बटर आणि एक चमचा पावभाजी मसाला घालून भाजी काही मिनिटे उकळा. यामुळे भाजी अधिक सुगंधी आणि चवदार बनते.

Web Title: A breakfast that will make everyone happy make famous street style pavbhaji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe
  • street food

संबंधित बातम्या

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
1

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
2

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
3

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.