Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोपळमध्ये वाढत आहे ‘ब्लड किक’ नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’

Blood Kick Trend : ‘ब्लड किक’ नावाचा ट्रेंड तरुणांना स्वतःचे रक्त काढण्यास प्रवृत्त करत असून भोपाळमध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, याचा आरोग्यावर परिणाम होत असून यामुळे मृत्यू होण्याचीही शक्यता असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 08:15 PM
भोपळमध्ये वाढत आहे 'ब्लड किक' नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’

भोपळमध्ये वाढत आहे 'ब्लड किक' नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’

Follow Us
Follow Us:
  • ‘ब्लड किक’ ट्रेंडमध्ये तरुण स्वतःचे रक्त काढून पुन्हा शरीरात टोचत आहेत.
  • या धोकादायक कृतीमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
  • संसर्ग, एचआयव्ही, सेप्सिस आणि इतर आजारांचा धोका वाढत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा.
सोशल मिडियावर दररोज एक नवीन प्रकारचा ट्रेंड येत असतो. हे ट्रेंड्स तरुण पिढीमध्ये फार लोकप्रिय होतात आणि अनेक लोक नित्यनियमाने ते फाॅलो देखील करतात. पण अलिकडेच एका धक्कादायक ट्रेंडची माहिती समोर आली आहे जो लोकांना स्वत:चेच रक्त काढण्यास प्रवृत्त करतो. होय, या जीवघेण्या ट्रेंडचे नाव ‘ब्लड किक’ असे असून भोपाळमध्ये हा ट्रेंड फार वेगाने वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. आपण आजवर ट्रेंडिंग गाणं, ट्रेडिंग डान्स स्टेप पाहिली आहे पण रक्तासोबतच्या या नव्या ट्रेंडने तर मात्र हद्दच पार केली. चला हा ट्रेंड नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

काय आहे ब्लड किक ट्रेंड?

या ट्रेंडमध्ये तरुण स्वतःच्या शरीरातून रक्त काढून ते पुन्हा टोचून घेतात, जेणेकरून त्यांना क्षणिक ऊर्जा, आराम किंवा नियंत्रणाचा अनुभव घेता येईल. गांधी वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी २०२६ पासून अशी किमान पाच प्रकरणे आढळून आली आहेत. सर्व रुग्ण १८ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. सुरुवातीला, कुटुंबीयांना केवळ वर्तणुकीतील बदल जाणवतात जसे की चिडचिड, राग आणि एकांताची नावड. पण हळूहळू, ही स्थिती इतकी गंभीर होते की त्यांना आपल्या मुलांना डाॅक्टरांकडे पाठवण्याची गरज भासते.

मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होता परिणाम

हमीदिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, हे प्रकरण पारंपरिक अमली पदार्थांच्या व्यसनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या तरुणांमध्ये दारू किंवा अमली पदार्थांची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु त्यांच्या शरीरावर सुईच्या खुणा स्पष्टपणे दिसतात. त्यांना वाटते की स्वतःचे रक्त शरीरात पुन्हा टोचल्याने तात्काळ आराम मिळतो, मात्र खरंतर याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो.

आजारांचा धोका वाढतो

तज्ञांच्या मते, या ट्रेंडचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. वारंवार स्वतःला इंजेक्शन लावल्याने संपूर्ण शरीरात संसर्ग पसरु लागतो. यामुळे सेप्सिस, एचआयव्ही आणि हिपॅटायटीससारख्या आजारांचा धोका वाढत असतो. इतकेच नाही तर यामुळे नसांचे नुकसान, रक्ताच्या गुठळ्या, ॲनिमिया आणि अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते. हा ताण आपले शरीर सहन करु शकत नाही आणि बऱ्याचदा यामुळे मृत्यूचाही धोका वाढतो.

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम

डाॅक्टरांचे म्हणणे आहे की, ही समस्या केवळ शारीरिक नसून याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही गंभार परिणाम होत असतो. यामुळे नैराश्याची भावना निर्माण होते आणि जेव्हा पुन्हा पुन्हा सुई शरीराला टोचवली जाते तेव्हा आपल्या सहनशक्तीवरही याचा परिणाम होऊ लागतो. यामुळे आंतरिक वेदनाही घडून येतात ज्या सहसा बाह्य शरीरात दिसून येत नाहीत. या धोकादायक प्रवृत्तीला खतपाणी घालण्यात सोशल मीडियादेखील मोठी भूमिका बजावत आहे. अधिकतर तरुण सोशल मिडियावर एक्टिव्ह असल्याने ते जे इथे पाहतात तेच करण्यास अधिक प्रवृत्त होतात. यामुळे चुकीची प्रक्रियाही तरुणांकडून फाॅलो केली जाते.

Web Title: A dangerous blood kick trend is on the rise in bhopal health risk lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Blood clots
  • Health Tips
  • lifestyle news
  • trends

संबंधित बातम्या

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
1

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
2

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
3

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास
4

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.