
स्वयंपाक घरातील चिमूटभर दालचिनी झपाट्याने कमी करेल पोटावर वाढलेला चरबीचा घेर!
वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाय?
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी उपाय?
दालचिनीचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
जेवणातील पदार्थ बनवताना वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय मसाले जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. मसाल्यांचा वापर केवळ जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी नाहीतर औषधांसाठी सुद्धा केला जातो. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले असलेले मसाले वजन कमी करण्यासाठी, साथीच्या आजारांपासून सुटका मिळवून देण्यासाठी मदत करतात. दालचिनीचा वापर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. दालचिनीमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. सूप, पंजाबी भाज्या किंवा चहा बनवताना दालचिनीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे किंवा गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण वारंवार केमिकल घटकांचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करण्यासाठी महागडा डाएट, गोळ्या औषध, जिम, सतत आहारात बदल, इंटिमेट फास्टिंग किंवा वेगवेगळे प्रकारच्या डाएट फॉलो केले जाते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून एकदा जेवण करतात. इतर वेळी कोणतेही पदार्थ खाल्लेले जात नाहीत. पण असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे सेवन किती प्रमाणात करावे? दालचिनीचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दालचिनीचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे चयापचय क्रिया सुधारते. यामुळे शरीरावर अनावश्यक चरबी साचून राहत नाही. वाढलेले वजन कमी करताना नियमित महिनाभर दालचिनीच्या पावडरचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले ड्रिंक नियमित प्यायल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
दालचिनीचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक ग्लास पाण्यात अर्धा तुकडा दालचिनी पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर पाणी टोपात घेऊन उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले पाणी नियमित सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया सुधारेल आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोमट दुधात दालचिनी पावडर मिक्स करून प्यावी.
दालचिनी पावडरचा वापर चहा, सूप, भाज्या, आमटी इत्यादी अनेक पदार्थांमध्ये दालचिनी पावडर टाकली जाते. दालचिनीच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. गॅस, अपचन,ऍसिडिटी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जेवणातील पदार्थांमध्ये दालचिनीचा वापर करावा. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनी पावडर अतिशय गुणकारी ठरते. या पदार्थाच्या सेवनामुळे साखर खाण्याची इच्छा कमी होऊन जाते.
Ans: वजन कमी करण्यासाठी फायबर (fiber) युक्त पदार्थ फायदेशीर असतात.
Ans: जीवनशैली, आहार आणि सातत्य यावर अवलंबून असते.
Ans: दररोज ७-९ तासांची झोप घेण्याचे लक्ष्य ठेवा. खराब झोपेमुळे चरबी वाढू शकते.