Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधी डिश पण मजेदार चव; घरी बनवा पंजाबी स्टाईल ‘दाल मखनी’, चव अशी की सर्वच होतील खुश

Dal Makhni Recipe : पंजाबच्या लज्जतदार पदार्थाला तुमच्या स्वयंपाकघरात आणा, घरी बनवा दाबा स्टाईल स्वादिष्ट डाल मखनी. काही साधं पण तितकंच चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर हा पदार्थ तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 08:15 PM
साधी डिश पण मजेदार चव; घरी बनवा पंजाबी स्टाईल 'डाल मखनी', चव अशी की सर्वच होतील खुश

साधी डिश पण मजेदार चव; घरी बनवा पंजाबी स्टाईल 'डाल मखनी', चव अशी की सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • दाल मखनी हा पंजाबचा एक लोकप्रिय पदार्थ आहे.
  • ही क्रिमी मसालेदार डाळ चवीला अप्रतिम लागते.
  • डाळ घट्ट असल्याने तिला चपाती आणि भात दोन्हींसोबत खाल्ले जाऊ शकते.
पंजाबी खाद्यसंस्कृतीतून आलेली डाळ मखनी ही एक अतिशय लोकप्रिय आणि समृद्ध चवीची डिश आहे. उत्तर भारतात विशेषतः पंजाबमध्ये ही डाळ सणावार, लग्नसमारंभ किंवा खास पाहुणचारासाठी बनवली जाते. “मखनी” या शब्दाचा अर्थच आहे लोण्यासारखी मऊ आणि क्रीमी, त्यामुळे या डाळीची टेक्स्चर खूपच रिच आणि स्मूद असते. काळी उडीद डाळ आणि राजमा यांचा संगम, त्यात बटर, क्रीम आणि सुगंधी मसाले या सगळ्यांमुळे डाळ मखनीला एक वेगळीच ओळख मिळते.

Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘आमपापड’, ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

ही डाळ साधी नसून हळूहळू शिजवून तयार केली जाते, त्यामुळे तिची चव अधिक खुलते. पारंपरिक पद्धतीत ही डाळ अनेक तास मंद आचेवर शिजवली जाते, ज्यामुळे तिचा प्रत्येक घास स्वादिष्ट आणि जिभेवर रेंगाळणारा बनतो. नान, रोटी किंवा जीरा राईससोबत ही डिश खूपच छान लागते. चला डाल मखनीची सविस्तर रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 1 कप काळी उडीद डाळ (साबूत)
  • 1/4 कप राजमा
  • 3 कप पाणी (शिजवण्यासाठी)
  • 2 टेबलस्पून बटर
  • 1 टेबलस्पून तेल
  • 1 मोठा कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 टोमॅटो (प्युरी केलेले)
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून धणे पावडर
  • मीठ चवीनुसार
  • 2 टेबलस्पून ताजी क्रीम
  • कोथिंबीर सजावटीसाठी
उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा! शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट बनवा कोकोनट राईस, नोट करून घ्या पदार्थ

कृती:

  • सर्वप्रथम काळी उडीद डाळ आणि राजमा स्वच्छ धुऊन 7-8 तास किंवा रात्रीभर भिजत ठेवा.
  • भिजवलेली डाळ आणि राजमा प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून 5-6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. डाळ पूर्णपणे मऊ झाली पाहिजे.
  • एका कढईत बटर आणि तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • आता आले-लसूण पेस्ट घालून 1-2 मिनिटे परता. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि मीठ घालून मसाला चांगला मिक्स करा.
  • शिजवलेली डाळ-राजमा या मसाल्यात घाला. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून मंद आचेवर 20-25 मिनिटे शिजू द्या. मध्ये मध्ये ढवळत राहा.
  • शेवटी गरम मसाला आणि क्रीम घालून 5 मिनिटे शिजवा. वरून बटर टाकून गॅस बंद करा.
  • गरमागरम डाळ मखनीवर थोडे बटर आणि क्रीम घालून सजवा. नान, तंदुरी रोटी किंवा जीरा राईससोबत सर्व्ह करा.
  • डाळ जास्त वेळ मंद आचेवर शिजवली तर तिची चव आणखी छान लागते. रेस्टॉरंटसारखी टेस्ट हवी असेल तर
  • शेवटी थोडे स्मोक (कोळशाचा धूर) देऊ शकता.
  • ही पंजाबी स्टाइल डाळ मखनी एकदा करून पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. तिचा रिच आणि क्रीमी स्वाद प्रत्येकाला आवडतो.

Web Title: A simple dish with a delightful taste make punjabi style dal makhani at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Punjab

संबंधित बातम्या

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
1

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
2

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
3

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
4

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.