उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा! शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट बनवा कोकोनट राईस, नोट करून घ्या पदार्थ
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. थंड पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात भात शिल्लक राहिल्यानंतर तो तसाच ठेवून दिला जातो. पण बऱ्याचदा शिल्लक राहिलेल्या भातापासून नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भातापासून कोकोनट राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोकोनट राईस खाल्ल्यामुळे पोटात थंडावा कायम टिकून राहील. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावे सुचत नाही. अशावेळी कोकोनट राईस उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये झटपट बनवा कैरीचा सार, नोट करा रेसिपी






