
आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय
ॲसिडिटी होण्याची कारणे?
शरीरात पित्त कशामुळे वाढते?
छातीत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी उपाय?
Acidity: रोजच्या आहारात होणारे बदल. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, चुकीच्या वेळी जेवण,अपुरी झोप आणि वारंवार उद्भवणारा अपचनाचा त्रास इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय तेलकट पदार्थांचे अतिसेवन, जास्त चहा-कॉफी घेणे किंवा तासनतास उपाशी राहिल्यामुळे अपचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. ॲसिडिटी झाल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या आणून खाल्ल्या जातात. यामुळे फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. पुन्हा एकदा ॲसिडिटी वाढून सतत आंबट ढेकर येणे, उलटी, मळमळ, तीव्र डोकेदुखी, पोटात आग, छातीमध्ये जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. शरीरात पित्त दोष वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पित्त हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताचा त्रास होणे म्हणजे आम्लपित्त, आम्लपदार्थ अन्ननलिकेत वर येणे असा आहे.(फोटो सौजन्य – istock)
अंड्यांमध्ये कोणकोणते मायक्रोन्युट्रीएंट असतात? आणि ते शरीरासाठी कसे महत्त्वाचे असतात? जाणून घ्या
अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर ते सहज पचन होण्यासाठी आम्ल तयार होत असते. पण आम्ल पचनाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असले तरी ते पोटाच्या बाहेरच आल्यानंतर छातीमध्ये जळजळ वाढणे, आंबट ढेकर येणे, खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन न होणे, पोट फुगणे, अस्वस्थता इत्यादी अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पोटात किंवा छातीमध्ये कधीतरी होणारी जळजळ अतिशय सामान्य मानली जाते, पण वारंवार पोटात जळजळ किंवा ॲसिडिटी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. काहींना रात्रीच्या वेळी खूप जास्त जेवण्याची सवय असते. ही सवय शरीरासाठी घातक ठरते. चला तर जाणून घेऊया ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय.
दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. भात, पोळी, भाकरी, ओट्स, दलिया यांसारख्या सौम्य पदार्थांचे सेवन करावे. यामुळे अपचनाचा त्रास होत नाही. याशिवाय दुधी भोपळा, घोसाळे, पडवळ, गाजर, भेंडी यांसारख्या सौम्य चवीच्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना वारंवार अपचनाचा त्रास होतो अशांनी आहारात अतितिखट किंवा अतिप्रमाणात तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे अपचनाचा त्रास खूप जास्त वाढतो.
दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक किंवा वाटीभर दही खावे. दही, ताक प्यायल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात केळे, खरबूज, कलिंगड, नाशपती किंवा सफरचंद यांसारखी फळे खावीत. अन्नपदार्थांच्या सेवनासोबतच नियमित भरपूर पाणी, शारीरिक हालचाली करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आहारात पपईसारख्या उष्ण पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. पण वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा घेऊन उपचार करावेत.
Ans: पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर आल्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ आणि पित्ताचा त्रास जाणवू शकतो. मसालेदार पदार्थ, जास्त तेलकट अन्न, अनियमित जेवण आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे यामुळे हा त्रास वाढू शकतो.
Ans: वेळेवर आणि कमी प्रमाणात जेवणे, भरपूर पाणी पिणे, मसालेदार व तेलकट पदार्थ कमी करणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नये यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
Ans: होय. जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्यास पोटातील आम्ल वर येण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे जेवल्यानंतर काही वेळ सरळ बसणे किंवा हलके चालणे फायदेशीर ठरू शकते.