Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार पिंपल्स येणे फक्त घाणीचे लक्षण नसून असू शकते ‘या’ आजारांचे संकेत, वेळीच ओळखा आणि जीव वाचवा

चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येणे ही फक्त सौंदर्याची समस्या नसून शरीरातील काही बदलांचे संकेत असू शकतात. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण यामागे वेगवेगळी कारणे दडलेली असू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 20, 2026 | 08:15 PM
वारंवार पिंपल्स येणे फक्त घाणीचे लक्षण नसून असू शकते 'या' आजारांचे संकेत, वेळीच ओळखा आणि जीव वाचवा

वारंवार पिंपल्स येणे फक्त घाणीचे लक्षण नसून असू शकते 'या' आजारांचे संकेत, वेळीच ओळखा आणि जीव वाचवा

Follow Us
Follow Us:
  • पिंपल्स वारंवार येणे हे शरीरातील काही बदलांचे संकेत असू शकतात.
  • आहार, जीवनशैली आणि दैनंदिन सवयींचा त्वचेवर मोठा परिणाम होतो.
  • समस्या वाढल्यास वेळेवर योग्य काळजी आणि तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
त्वचेवर येणाऱ्या समस्या या फक्त चेहऱ्याचे साैंदर्य धोक्यात घालत नसतात तर त्या अनेक आजारांचे संकेतही देत असतात. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागले आपण प्रथम फेसवाॅशचा वापर सुरु करतो. चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी फेसवाॅश एक उत्तम पर्याय मानला जातो. पिंपल्स हे शरीरातील घाणीमुळे येत असतात असे आपल्याला वाटते पण ते पुन्हा पुन्हा येत असतील तर त्याचे कारण काही वेगळेही असू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, सतत येणारे हे पिंपल्स कधीकधी काही आरोग्य समस्यांचे संकेत देत असतात.

चेहऱ्यावर येणारे पिंपल्स नेहमी बाहेरील घाणीचे कारण नाही तर शरीराच्या आत असलेल्या समस्यांचेही कारण असू शकते. जर शरीरात पोषकतत्वांची कमतरता असेल किंवा हार्मोन्सचे संतुलन बिघडले असेल, तर ते आपल्या त्वचेवर मुरुमांच्या रूपात दिसून येते. चला, वारंवार होणाऱ्या मुरुमांच्या कारणांविषयी काही सविस्तर जाणून घेऊया.

तापमान 40° पार? कडक उन्हातही झाडे राहतील हिरवीगार, फक्त या सोप्या घरगुती ट्रिक्सचा वापर करा

पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर पिंपल्य येण्याची कारणे?

हार्मोनल असंतुलन
हार्मोनल असंतुलन हे पिंपल्सचे मुख्य कारण ठरु शकते. यामुळे त्वचेत अतिरिक्त तेल निर्माण होऊ लागते, जे त्वचेच्या छिद्रांना बंद करते, बॅक्टेरिया वाढवते आणि परिणामी चेहऱ्यावर पिंपलची समस्या निर्माण करते.

पीसीओएस
महिलांमधील पीसीओएस किंवा मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अनेकदा हनुवटी आणि जबड्यावर पिंपल्सची समस्या वाढू लागते.

आहार
अधिक प्रमाणात साखरेचे किंवा दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या वाढू लागते. या पदार्थांमुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढते ज्यांचा परिणाम पिंपल्सच्या वाढीवर होऊ लागतो.

तणाव आणि मानसिक आरोग्य
जेव्हा आपण तणावपूर्ण वातावरणात असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढू लागते. यामुळे त्वचेतून जास्त प्रमाणात तेल बाहेर पडते आणि छिद्रे बंद होऊन पिंपल्स येऊ लागतात. तणावामुळे झोपही अपुरी राहते , ज्यामुळे त्वचेला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळत नाही.

पिंपल्स रोखण्यासाठी काय करावे?

आहारातील बदल
पिंपल्सना रोखायचे असेल तर आहारात महत्त्वपूर्ण बदल करणं फार गरजेचं ठरतं. साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमी करा. आता आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा असा प्रश्न पडत असल्यास आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करु शकता.

जास्त पाणी प्या
पाण्याचे सेवन शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. .यासाठी दररोज किमान ३-४ लिटर पाण्याचे सेवन करा. तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरते.

झोप पूर्ण करा
आपली अपूरी झोप आपल्या त्वचेवर परिणाम करत असते. तणाव कमी करण्यासाठी दररोज ७-८ तास गाढ झोप घेणे चांगले ठरते.

सॉफ्ट, चमकदार केसांसाठी पार्लरला जाण्याची गरज नाही, भेंडीचं पाणी देईल प्रभावी परिणाम, तुम्ही एकदा वापरून तर पहा…

चेहऱ्याची स्वच्छता
चेहरा दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही सौम्य क्लिनझर किंवा फेसवाॅशचा वापर करु शकता. चेहरा धुतल्याने यावरील घाण दूर होते आणि तेलकटपण चेहऱ्यावर साचत नाही.

डाॅक्टरांचा सल्ला
जर फार काळापासून तुम्हाला पिंपल्सची समस्या जाणवत असेल आणि अनेक उपाय करुनही काही फरक पडत नसेल तर लगेच रुग्णालय गाठा आणि यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Acne not just dirt signs of serious diseases symptoms causes treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • how to get rid of pimples
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
1

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
2

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
3

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.