Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॅपटॉप, मोबाईलचे व्यसन भोवतेय; जिल्हा रुग्णालयात ५० टक्के रुग्णांमध्ये दुखणी, मानदुखी-कंबरदुखीचे रुग्ण वाढले

लॅपटॉप आणि मोबाईलशिवाय आपलं पान हलत नाही. यामुळे अनेक आजारांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि तज्ज्ञांनी केलेल्या खुलाशानुसार, स्क्रिनमुळे आणि या व्यसनामुळे कण्यावर-मानेवर ताण येत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 29, 2025 | 10:33 PM
लॅपटॉप-मोबाईलमुळे मान-कंबरेवर ताण (फोटो सौजन्य - iStock)

लॅपटॉप-मोबाईलमुळे मान-कंबरेवर ताण (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • लॅपटॉप मोबाईलचे वाढते व्यसन 
  • पाठ आणि मानेचे आजार वाढले
  • जिल्हा रुग्णालयात अधिक रूग्ण 

आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय जीवनच अशक्य झालंय. पण या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागात येणाऱ्या तब्बल ५० टक्के रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे. चुकीची जीवनशैली, सतत बसून काम करण्याची पद्धत, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावर ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातो.

मान, पाठीच्या स्नायूंवर येतो ताण

तासनतास संगणक वा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत राहिल्याने मान आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येतो. परिणामी मनेत वेदना, चक्कर येणे, हातात मुंग्या येणे, अशक्तपणा, तर काही प्रकरणात पकड कमी होण्याची लक्षणे दिसतात. कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कंबरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशा आढळतात. या तक्रारीवर रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महागडे याच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचारपद्धतीने उपचार केले जातात.

सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये का होत आहे झपाट्याने वाढ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

दररोज ५० रुग्ण उपचारांसाठी येत आहेत 

विभागात दररोज साधारण ५० रुग्ण उपचारासाठी येत असून, यापैकी अध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम-धंड शेक, चुंबकीय, विद्युत, ध्वनीलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार दिले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपीचा वापर केला जातो. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते.

शरीराची योग्य काळजी घेणे हेच खरे औषध आहे. मोबाईल आणि लॅपटॉपच्या युगात शरीराचा नेटवर्क ही कायम जोडलेला राहावा, यानसठी आता प्रत्येकाने थोड थांबून स्वत कडे लक्ष देणे गरजेचं झालंय – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे

वजनावर नियंत्रण गरजेचे

योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास मणक्यांच्या शस्त्रक्रिया टाळता येतात. आजच्या तरुण पिढीने शरीराचे सिग्नल ओळखून वेळेवर सावध झाले पाहिजे. आरोग्यदायी मणक्यासाठी संतुलित आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि डी युक्त अन्न, दररोजचा हलका व्यायाम, थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे, योग्य खुचींचा वापर, स्क्रीन नजरेच्या समांतर ठेवणे आणि वजन उचलताना गुडघे वाकवणे हे सोपे पण प्रभावी नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

सतत मोबाईल किंवा लॅपटॉप पाहून मान आखडली आहे? मग ‘या’ पद्धतीने हाताच्या अंगठयाने करा मसाज

Web Title: Addiction to laptops and mobile phones is increasing 50 percent of patients in the district hospital suffer from pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:33 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

लघवी करताना कायमच जळजळ- वेदना होतात ? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
1

लघवी करताना कायमच जळजळ- वेदना होतात ? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

वाढत्या थंडी शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ सूपचे सेवन, कायमच राहाल निरोगी
2

वाढत्या थंडी शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ सूपचे सेवन, कायमच राहाल निरोगी

लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यावसायिकांसाठी सेमाग्लुटाइड उपचार प्रभावी !जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती
3

लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यावसायिकांसाठी सेमाग्लुटाइड उपचार प्रभावी !जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

औषध न घेता कमी होईल रक्तातील साखर! सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पेयांचे सेवन, रक्तवाहिन्या राहतील कायमची निरोगी
4

औषध न घेता कमी होईल रक्तातील साखर! सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पेयांचे सेवन, रक्तवाहिन्या राहतील कायमची निरोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.