मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
धावपळीवाच्या जीवनात सतत काम आणि इतर गोष्टींमध्ये व्यस्थ असल्यानंतर इतर काम करण्यास वेळ मिळत नाही. सतत मोबाईल, लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे डोळे आणि मानाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. घरातून ऑफिसचे काम करताना किंवा ऑफिसामध्ये तासनतास बसून काम केल्यामुळे मानेच्या शिरा पूर्णपणे आखडून जातात. मानेच्या नसा दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण शरीर हळूहळू दुखू लागते. अनेकजण मानेची समस्या उद्भवू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे पुढे जाऊन गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
मान दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू चक्कर येणे, हातापाय दुखणे, हातापायांमध्ये वेदना होणारे, हाताला किंवा पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, थकवा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे योग्य वेळी या आजाराकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे गरजेचे आहे. तसेच आज आम्ही तुम्हाला मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी हाताच्या अंगठ्याने कसा मसाज करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वयाच्या ९ किंवा १० वर्षात मासिक पाळी येण्यामागे नेमकी काय आहेत कारण? जाणून घ्या सविस्तर

मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सतत मान दुखत राहिल्यामुळे स्नायूंमध्ये तणाव आणि वेदना होण्यास सुरुवात होते. या वेदना होऊ लागल्यानंतर मानेच्या कोणत्याही भागात गाठ किंवा सूज येते. मानेच्या दुखण्यामुळे आलेली गाठ सोडवणे आवश्यक आहे. मानेमध्ये ही गाठ अशीच राहिल्यास पुढे जाऊन गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मानेच्या दुखण्यावर आराम मिळ्वण्यासाठी हाताच्या अंगठयाने तुम्ही मसाज करू शकता. हाताच्या अंगठयाने मान जिथे दुखत आहे तिथे 1 किंवा 2 सेकंड दाबून ठेवा. असे 10 ते 15 वेळा केल्यानंतर तुम्हाला आराम मिळेल.
मान जास्त दुखू लागल्यानंतर दोन्ही हातांचे अंगठे मानेच्या आणि पाठीच्या सुरुवाती मध्यभागी दाबून ठेवा. आणि दोन्ही खांद्यांना हलक्या हाताने दाबा. हा मसाज तुम्ही 10 ते 15 वेळा केल्यास आराम मिळेल.
हे देखील वाचा: पोषक तत्वांनी समृद्ध असलेला मखाणा खाण्याचे फायदे, आरोग्यासंबंधित समस्या होतील दूर
मानेचा जो भाग दुखत आहे तिथे अंगठ्याच्या साहाय्याने दाबून ठेवा. त्यानंतर हळूहळू अंगठा खांद्यावर आणून दाबा. हा उपाय नियमित केल्यास खांदा दुखणे कमी होऊन मानेवर आराम मिळेल.






