कोरोना काळात अनेकांना कोरोना होऊन गेला. तर अद्यापही काही कोरोना रुग्ण आढळत आहेत. पण कोरोनातून बरं झाल्यानंतर इतर व्याधीही जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. तर अनेकांना कंबरदुखी देखील सतावत आहे. यावर तज्ञांनी आपलं मत मांडलं आहे. पाहा काय आहे नेमकं कारण.
[caption id="attachment_231201" align="aligncenter" width="2036"]
कोरोना काळात अनेकांना कोरोना होऊन गेला. तर अद्यापही काही कोरोना रुग्ण आढळत आहेत. पण कोरोनातून बरं झाल्यानंतर इतर व्याधीही जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. तर अनेकांना कंबरदुखी देखील सतावत आहे. यावर तज्ञांनी आपलं मत मांडलं आहे. पाहा काय आहे नेमकं कारण.[/caption]
[caption id="attachment_231202" align="aligncenter" width="340"]
विदेशात कोरोनानंतरच्या सिम्पटम्प्सवर अनेक संशोधनं होत आहेत. यात काही लाँग टर्म लक्षणांमध्ये कंबरदुखीचाही समावेश आहे. एका स्टडीनुसार ४२ ते ६३ टक्क्यांपर्यत रुग्णांना कंबरदुखीचा त्रास सतावत आहे.[/caption]
[caption id="attachment_231198" align="aligncenter" width="2100"]
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार एशियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स फरीदाबादमध्ये कन्स्लटंट डॉ चारू दत्त अरोरा यांनी सांगितलं की, कंबरदुखी कोविडनंतर दिसणारं प्रमुख लक्षण आहे. डॉ चारू म्हणतात की, सामान्यता लोक कोरोनाला केवळ श्वसनासंबधी आजार म्हणूनच पाहतात मात्र त्याचा इतर दिर्घकाळ टिकणारे लक्षणं तसेच फुफ्पुसांव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही त्याचा प्रभाव जाणवू शकतो.[/caption]
[caption id="attachment_231200" align="aligncenter" width="600"]
एक्सपर्ट्सच्या मते कोविड-19 नंतर साइटोकायनेस हार्मोन खूप जास्त सक्रिय होतं. आणि त्यामुळे कंबरदुखी वाढते. तर हे लक्षण दीर्घकाळही टिकू शकते.[/caption]
[caption id="attachment_231203" align="aligncenter" width="1080"]
डॉ. चारु यांनी सांगितले की, कंबरदुखी कोरोनानंतर चार ते पाच दिवस राहते. मात्र दीर्घकालीन लक्षणांमध्ये ती ६ ते ९ महिन्यांपर्यत देखील राहू शकते. तो सायटोकिन्सचा परिणाम असतो, त्यामुळे कंबरदुखी होते.[/caption]






