Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCOS झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे? वेळीच लक्ष देऊन घ्या आरोग्याची काळजी

महिलांमध्ये सामन्यात पीसीओस आणि पीसीओडीचा त्रास दिसून येतो. ही समस्या उद्भवल्यानंतर अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, पुरळ येणे, चेहऱ्यावर नको असलेले केस वाढणे, गर्भधारणा होण्यात अडचण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवल्यानंतर वेळीच लक्ष नाही दिले तर आरोग्यसंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते.पीसीओसचा त्रास जाणवू लागल्यानंतर महिलांमध्ये तणाव, चिंता वाढू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2024 | 12:30 PM
PCOS झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

PCOS झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या पिण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलनाचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर शारीरिक आणि मानसिक अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य बिघडून जाते. महिलांमध्ये सामन्यात पीसीओस आणि पीसीओडीचा त्रास दिसून येतो. ही समस्या उद्भवल्यानंतर अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, पुरळ येणे, चेहऱ्यावर नको असलेले केस वाढणे, गर्भधारणा होण्यात अडचण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवल्यानंतर वेळीच लक्ष नाही दिले तर आरोग्यसंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते.पीसीओसचा त्रास जाणवू लागल्यानंतर महिलांमध्ये तणाव, चिंता वाढू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पीसीओसचा त्रास जाणवू लागल्यानंतर महिलांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

पीसीओसची लक्षणे:

अचानक वजन वाढणे:

पीसीओसचा त्रास जाणवू लागल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे अचानक वजन वाढणे. वजन वाढल्यानंतर लठ्ठपणा आणि शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. यासाठी आहारात सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन करावे. ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यामुळे चयापचय सुधारण्यास मदत होते.

हे देखील वाचा: महिनाभर भात न खाल्यास आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम

सतत मूड स्विंग्स होणे:

महिलांमध्ये पीसीओसची समस्या उदभल्यानंतर सतत मूड स्विंग्स होऊ लागतात. कोणत्याही कारणांवरून चिडचिड करणे, काम न करण्याची इच्छा निर्माण होते. मग्नेशियम ग्लाइसीनेट तणाव आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी आहारात बदल करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

चेहऱ्यावर नको असलेले केस:

काही वेळा महिलांच्या तोंडावर नको असलेले अतिरिक्त केस येण्यास सुरुवात होते. हे केस वाढल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे. पुदिन्याच्या चहा प्यायल्यामुळे चेहऱ्यावर नको असलेल्या केसांची वाढ होत नाही. केसांची वाढ नियंत्रणात राहण्यास मदत होते.

केस गळणे:

महिलांचे केस गळणे ही एक सामान्य समस्या असून सर्वच महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.पीसीओसचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात. केस पूर्णपणे पातळ आणि कोरडे होतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी झिंक, सेलेनियम आणि लोह इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

हे देखील वाचा: सकाळी उठल्यानंतर नियमित करा तुळशीच्या पाण्याचे सेवन, शरीरासह त्वचेला होतील अनेक फायदे

चेहऱ्यावर पुरळ येणे:

केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर त्वचेवर पुरळ येऊ लागते. त्वचेवर आलेली पुरळ कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पुरळमुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी कॉड लिव्हर ऑइलचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After pcos the body shows these serious symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी
1

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Pomogranate Benefits: सकाळी उठल्यानंतर नियमित करा वाटीभर डाळिंबाचे सेवन, रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स
2

Pomogranate Benefits: सकाळी उठल्यानंतर नियमित करा वाटीभर डाळिंबाचे सेवन, रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स

Health Update: रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य
3

Health Update: रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून
4

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.