जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवण जेवल्यासारखं वाटत नाही. काहींना संध्याकाळच्या जेवणात आणि इतर वेळी भात खायची सवय असते. पण अतिप्रमाणात भाताचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. सतत भात खाल्यामुळे मधुमेह होऊ शकतो, तसेच शरीरातील गुल्कोजचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिनाभर भात न खाल्यामुळे शरीरावर कोणते परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात जर तुम्हाला भात खाण्याची सवय असेल तर तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी उकड्या तांदुळाचा भात खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया महिनाभर भात न खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
भात खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
तांदळामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात खाण्याऐवजी इतर पदार्थांचे सेवन करावे.
पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात पांढऱ्या रंगाच्या तांदुळाचे सेवन करू नये.
सतत भात खाल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे भात खाण्याऐवजी इतर कडधान्यांचा आहारात समावेश करावा.
पांढऱ्या रंगाच्या तांदळात स्टार्चचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणात पांढऱ्या रंगाचा भात खाऊ नये.
पांढऱ्या तांदळाचे आहारात सेवन केल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होण्यास मदत होते. यामुळे जास्त थकवा आणि झोपू येऊ लागते. त्यामुळे आहारात इतर तांदळाचे सेवन करावे.