Menopause म्हणजे काय? मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी, राहाल कायमच आनंदी
मासिक पाळी अचानक बंद होण्याची कारणे?
मेनोपॉज म्हणजे काय?
मेनोपॉजच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
वय वाढत्या महिलांसह पुरुषांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. महिलांच्या शरीरात दिसून येणारे बदल अतिशय गंभीर असतात. त्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर स्वतःच्या आरोग्याची खूप जासि काळजी घ्यावी. महिला कायमच वेगवेगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा तणाव, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया, मासिक पाळी इत्यादी गोष्टींमुळे महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बदलून जाते. महिला कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमुळे असह्य वेदना, चिडचिड, थकवा इत्यादी गोष्टींचा सामना महिलांना करावा लागतो. पण कालांतराने वयाच्या ४५ किंवा ५० व्या वर्षी मासिक पाळी अचानक बंद होते. याला मेनोपॉज असे म्हणतात. अचानक बंद झालेल्या मासिक पाळीचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा अनेकांना वाटते की मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांचे जीवन आणखीनच सुखकर होते. यामुळे शरीरात कोणताही बदल दिसून येत नाही. हा गैरसमाज आहे. मेनोपॉज महिलांना इमोशनली खूप जास्त प्रभावित करतो. ज्याच्या परिणामामुळे महिला सतत चिडचिड, राग व्यक्त करणे इत्यादी भावनिक समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या वयात मेनोपॉजमुळे महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
मेनोपॉज म्हणजे कोणत्याही वयात मासिक पाळी अचानक बंद होणे. सामान्यपणे ९ ते १६ वयादरम्यान मुलींना मासिक पाळी येते आणि वयाच्या ६० व्या वर्षानंतर पाळी बंद होते. पण हल्ली जीवनशैलीतील बदलांमुळे ४५ ते ५५ वयादरम्यान मेनोपॉज सुरू होतो. हा महिलांच्या शरीरात होणारा नैसर्गिक बदल आहे. पण यामुळे असंख्यसमस्या उद्भवतात. मेनोपॉज हा कोणताही आजार नसून महिलांच्या शरीरातील मासिक पाळी वेळे आधीच बंद होणे.
Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून
मासिक पाळी बंद झाल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. व्यायामासोबतच नियमित योगासने, प्राणायाम केल्यास मन शांत राहील. चिडचिड किंवा नैराश्य जाणवल्यास कुटुंबीयांशी संवाद साधावा. यामुळे मनावर आलेले ओझे कमी होते. मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील हाडांवर त्याचा गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आहारात कॅल्शियम आणि विटामिन डी युक्त पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. मन शांत राहण्यासाठी नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घ्यावी. झोपल्यामुळे मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहते.
Ans: सरासरी वय ५१ वर्षे आहे, परंतु ४५ ते ५५ वर्षे वयोगटात ही प्रक्रिया सामान्य आहे.
Ans: अनियमित पाळी, अचानक गरम वाटणे (Hot flashes), रात्री घाम येणे, मूड बदलणे (mood swings), निद्रानाश आणि शरीराच्या वजनात वाढ।
Ans: ४० ते ४५ वयोगटात रजोनिवृत्ती झाल्यास त्यास "लवकर रजोनिवृत्ती" आणि ४० पूर्वी झाल्यास "अकाली रजोनिवृत्ती" म्हणतात.






