Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुरंधरच्या यशानंतर अभिनेत्री यामी गौतम नवऱ्यासोबत पोहचली नैना देवी मंदिरात; या ठिकाणी प्रकट झाला सतीच्या नेत्रांचा अवतार

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ला दणदणीत यश मिळाल्यानंतर आदित्य धर आणि यामी गौतम यांनी हिमाचलमधील प्रसिद्ध शक्तिपीठ नैना देवी मंदिरात दर्शन घेतले. श्रद्धा, निसर्गसौंदर्य आणि शांततेचा अनुभव देणारे हे पवित्र स्थळ भक्तांसाठी खास आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2025 | 08:36 AM
धुरंधरच्या यशानंतर अभिनेत्री यामी गौतम नवऱ्यासोबत पोहचली नैना देवी मंदिरात; या ठिकाणी प्रकट झाला सतीच्या नेत्रांचा अवतार

धुरंधरच्या यशानंतर अभिनेत्री यामी गौतम नवऱ्यासोबत पोहचली नैना देवी मंदिरात; या ठिकाणी प्रकट झाला सतीच्या नेत्रांचा अवतार

Follow Us
Close
Follow Us:
  • धुरंधर चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे
  • या चित्रपटाचे दिग्दर्शन यामी गौतमचा पती अधित्य धर याने केले होते
  • चित्रपटाच्या यशानंतर दोघांनी हिमाचल प्रदेशातील एका नैना देवीच्या मंदिराचे दर्शन घेतले
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाल्यानंतर दिग्दर्शक आदित्य धर आपल्या पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमसोबत हिमाचल प्रदेशात दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी शक्तिपीठ असलेल्या नैना देवी मंदिरात आई भगवतीचे दर्शन घेतले. यावेळी यामी गौतम यांची आई अंजली गौतम, मामा अनूप गौतम तसेच सचिन व मोहित गौतम हे कुटुंबीयही उपस्थित होते. आदित्य धर यांनी मंदिरात विधीवत पूजा केलीच, शिवाय कंजक पूजन करून आईच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

शक्तिपीठ नैना देवी मंदिर

नैना देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात उंच पर्वतरांगांवर वसलेले एक प्रसिद्ध आणि पवित्र शक्तिपीठ आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवी सतीच्या नेत्रांचा (नैना) अवतार या ठिकाणी प्रकट झाला, त्यामुळे या स्थळाला ‘नैना देवी’ असे नाव मिळाले. हे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. मंदिर परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य असून येथून गोविंद सागर धरणाचे जलाशय आणि आजूबाजूच्या पर्वतांचे मनमोहक दृश्य दिसते. त्यामुळे श्रद्धा आणि निसर्गसौंदर्य यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो.

नैना देवी मंदिराशी संबंधित श्रद्धा

या मंदिरात देवी नैना देवीची उपासना केली जाते. भक्तांचा ठाम विश्वास आहे की येथे मनोभावे केलेली प्रार्थना संकटे दूर करते आणि जीवनात सुख-समृद्धी घेऊन येते. पिढ्यान् पिढ्या भाविक येथे येऊन आईसमोर नतमस्तक होतात, आपल्या मनोकामना मांडतात आणि पूर्णत्वाची भावना घेऊन परततात.

दर्शनाची वेळ

नवरात्रोत्सव आणि मोठ्या सणांच्या काळात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्या वेळी मंदिर पहाटे लवकर उघडले जाते आणि कधी कधी मध्यरात्रीपर्यंत दर्शन सुरू असते, जेणेकरून सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. सामान्य दिवसांत सकाळी लवकर किंवा संध्याकाळी दर्शनासाठी येणे सोयीचे ठरते, कारण त्या वेळी गर्दी तुलनेने कमी असते.

नैना देवी मंदिरापर्यंत कसे पोहोचाल

  • नैना देवी मंदिरासाठी सर्वात जवळचे विमानतळ चंदीगड असून तेथून मंदिर सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे.
  • जवळचे रेल्वे स्थानक आनंदपूर साहिब आहे, जे सुमारे २५ किलोमीटरवर आहे. दिल्लीपासून हे मंदिर सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर तर चंदीगडपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे.
  • पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील अनेक शहरांतून येथे नियमित बससेवा उपलब्ध आहे. चंदीगड, आनंदपूर साहिब किंवा किरतपूर साहिब येथून टॅक्सीही सहज मिळतात. किरतपूर साहिबपासून मंदिर अंदाजे ३० किलोमीटरवर असून त्यातील सुमारे १३ किलोमीटरचा मार्ग डोंगराळ आहे. आनंदपूर साहिबपासून अंतर सुमारे २० किलोमीटर आहे.
  • भाविकांसाठी रोपवेची सुविधाही उपलब्ध असून त्यामुळे चढाई अधिक सोपी होते. बस स्टँडपासून पालखी किंवा पायीही मंदिरात जाता येते.
नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

 टिप्स

  • नवरात्रोत्सव आणि सणांच्या काळात गर्दी जास्त असल्याने दर्शनासाठी आधीच नियोजन करणे चांगले.
  • डोंगराळ चढाईसाठी आरामदायक पादत्राणे घालावीत.
  • प्रथमच येणाऱ्या भाविकांसाठी स्थानिक मार्गदर्शक उपलब्ध असतात.
  • मंदिरात साधे आणि सुसंस्कृत वस्त्र परिधान करणे तसेच शांत आणि आदरयुक्त वर्तन ठेवणे अपेक्षित असते.
  • आई नैना देवी हे हिमालयातील श्रद्धेचे एक भक्कम प्रतीक मानले जाते. येथे येणारा प्रत्येक भक्त आईच्या
  • आशीर्वादाने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि समाधान घेऊन परततो.

Web Title: After the success of dhurandhar yami gautam and aditya dhar visite naina devi temple travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • temple
  • travel news
  • Yami Gautam

संबंधित बातम्या

टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या
1

टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या
2

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष
3

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 
4

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.