वयाच्या १०० वर्षांपर्यंत शरीरातील सर्वच हाड राहतील कायमच मजबूत! १ रुपयांचे 'हे' औषधी पान शरीरासाठी ठरेल वरदान
पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षांनंतर शरीरसंबंधित समस्या उद्भवत होत्या. पण हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होत आहे. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळातील सर्वच वयस्कर लोक पान खायचे. हिरवं, चमकदार आणि सुगंधी पान केवळ चवीसाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. पान खाल्यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी, दातांच्या समस्या इत्यादी अनेक गोष्टींपासून सुटका मिळते. आकाराने लहान असलेले १ रुपयांचे पान संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणानंतर पान खाल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पचनाच्या समस्या उद्भवतात. पोट फुगणे, पोटात दुखणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे आतड्यांमधील अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. ज्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आंबट ढेकर येणे, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पान खावे. खायचे पान दिवसभरात एकदा खाल्यास पचनक्रिया कायमच निरोगी राहील. पान खाल्यामुळे लाळेचं स्राव वाढतो, ज्यामुळे पचनक्रिया सक्रिय राहते.
सर्दी, खोकला किंवा साथीच्या आजारांमुळे श्वासाच्या समस्या वाढतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खायचे पान अतिशय गुणकारी ठरते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण श्वसनसंस्थेतील सूज कमी करतात. लहान मुलांना वारंवार कफाचा त्रास होत असेल तर गरम पाण्यात खायचे पान उकळवून पान उकळवून त्याचा रस मुलांना पिण्यास द्यावा.
शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू नये म्हणून खायच्या पानाचे सेवन करावे. पानांमध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स कमी करतात, ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका टाळतो. तसेच पानामधील फाइटोन्युट्रिएंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित एक किंवा दोन पाने खावीत.
पायातील ‘हे’ बदल ठरतील जीवघेणे! वाढतील आजार, जाणून घ्या
शरीरात वाढलेला मानसिक तणाव संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवतो. त्यामुळे खायच्या पानाचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे मूड सुधारतो, मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. मेंदूला शांतता आणि ताजेपणा देण्यासाठी पाने खावे. मेंदूमधील एसीटिलकोलाइन नावाचे तत्व संतुलित ठेवण्यासाठी खायचे पान अतिशय गुणकारी आहे.यासोबतच हाडांचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी पान खावे.
पचन म्हणजे काय?
पचन ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यात अनेक अवयव एकत्र काम करतात. तुम्ही खाल्लेल्या आणि प्यायलेल्या पदार्थांमधून शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळवण्यासाठी ही प्रक्रिया होते.
पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात का?
अनेक कारणांमुळे पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात, जसे की चरबीयुक्त आणि मसालेदार पदार्थ खाणे, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव.
पचनक्रियेतील सामान्य समस्या कोणत्या आहेत?
पचनाच्या सामान्य समस्यांमध्ये पोटदुखी, छातीत जळजळ, मळमळ आणि आतड्यांसंबंधी सिंड्रोम (IBS) यांचा समावेश होतो. काहीवेळा ही लक्षणे अधिक गंभीर आरोग्य समस्या दर्शवू शकतात, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.