Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

केसांच्या वाढीसाठी पूर्वीच्या काळी राण्या आयुर्वेदिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करायच्या. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे केसांना पोषण मिळते आणि केस चमकदार होतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2026 | 10:20 AM
घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या 'हे' प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या 'हे' प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना आपले केस कायमच सुंदर आणि चमकदार हवे असतात. केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट, हेअर केअर प्रॉडक्टचा सुद्धा वापर केला जातो. मात्र पूर्वीच्या काळी कोणतेही हेअर केअर प्रॉडक्ट किंवा केसांसंबधित ट्रीटमेंट उपलब्ध नव्हत्या. तरी सुद्धा भारतीय राण्यांचे केस अतिशय घनदाट, मऊ आणि मजबूत होते. निसर्गाच्या कुशीत आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले उपाय करून केसांची काळजी घेतली जायची. मात्र हल्लीच्या महागड्या ट्रीटमेंट करून सुद्धा केसांची गुणवत्ता चांगली राहत नाही. आज आम्ही तुम्हाला घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या कोणते आयुर्वेदिक हेअर मास्क वापरायच्या, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. हे हेअर मास्क वापरल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यासोबतच केस अतिशय सुंदर होतील.(फोटो सौजन्य – istock)

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

मेथी दाणे आणि दही हेअरमास्क:

वातावरणातील बदलांमुळे केस कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर मेथी दाण्यांच्या हेअर मास्कचा वापर करावा. मेथी दाण्यांमध्ये असलेले घटक टाळूवर वाढलेला कोंडा कमी कारण्यासोबतच केस गळती सुद्धा थांबतात. यासाठी वाटीमध्ये मेथी दाणे भिजत ठेवा. ५ तास मेथी भिजल्यानंतर मऊ होईल. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मेथी दाणे आणि दही घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. ३० मिनिट ठेवल्यानंतर हेअर मास्क पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा लावल्यास केस मजबूत आणि स्वच्छ होतील.

जास्वंद आणि नारळाचे दूध:

केसांची काळजी घेण्यासाठी महिला जास्वदींच्या फुलांचा हेअर मास्क बनवून केसांवर लावावा. जास्वदींची फुले मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट बनवा. तयार केलेल्या पेस्टमध्ये नारळाचे दूध मिक्स करून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट केसांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. यामुळे केस अतिशय मुलायम आणि सॉफ्ट होण्यास मदत होईल. नारळाचे दुधात असलेले प्रोटीन केस दाट करण्यास मदत करते. हेअर मास्क ३० मिनिट केसांवर ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या.

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

आवळा, शिकाकाई आणि तांदळाचे पाणी:

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा केसांच्या वाढीसाठी खूप जास्त प्रभावी ठरतो. पूर्वीच्या काळी शाम्पू म्हणून शिकाकाईचा वापर केस स्वच्छ करण्यासाठी केला जायचा. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक मुळांपासून मजबूत करण्यास मदत करतो. राजघराण्यांमध्ये कोमट पाण्यात शिकेकाई भिजत ठेवून नंतर केसांच्या मुळांवर लावून काहीवेळ तशीच ठेवली जायची. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुतले जायचे. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणकारी घटक केस मऊ करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Ancient ayurvedic hair mask used by indian queens for thick and strong hair discover the secret to healthy hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
1

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो
3

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
4

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.