ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग 'हा' घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
सर्वच महिला चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात, पण ओठांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. ओठांसोबतच आजूबाजूची त्वचा सुद्धा काळी पडून जाते. याशिवाय कपाळ आणि हनुवटीच्या आजूबाजूचा भाग सुद्धा काळा दिसू लागतो. अशावेळी फेशिअल, क्लीनअप किंवा इतर महागड्या स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. तर काहीवेळा महिला वेगवेगळ्या केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेवर लावल्यास चेहरा निस्तेज होण्यासोबतच ओठांची त्वचा सुद्धा कोरडी पडून जाते. थंडीच्या दिवसांमध्ये ओठ कोरडे पडणे ही अतिशय सामान्य समस्या आहे.(फोटो सौजन्य – istock)
वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
ओठांवर वाढलेला काळेपणा, ओठ कोरडे पडणे तर काहीवेळा ओठांची त्वचा निघणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागल्यानंतर कायमच केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला ओठांवरील काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा गुलाबी आणि चमकदार करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती उपाय किंवा स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्याला किंवा ओठांना कोणतीही हानी पोहचत नाही. ओठ कायमच सुंदर दिसतात.
ओठांवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने क्रीम तयार करावी. यासाठी वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात मध घालून चमच्याने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा. तयार केलेली क्रीम नियमित ओठांवर आणि आजूबाजूच्या काळ्या पडलेल्या त्वचेवर लावल्यास ८ दिवसांमध्ये ओठ गुलाबी आणि हायड्रेट दिसतील. तयार केलेली क्रीम ३ ते ४ आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते आणि ओठ सुंदर दिसतात.
सर्वच ऋतूंमध्ये ओठांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. ओठांना कोणतीही लिपस्टिक किंवा लिपबाम लावताना ते ओठांना सूट होईल की नाही याची खात्री करावी, अन्यथा ओठांचे नुकसान होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन झाल्यानंतर ओठांवरील त्वचा सुद्धा काळी पडण्यास सुरुवात होते, त्यामुळे भरपूर पाणी आणि विटामिन सी असलेल्या पदार्थांचे, फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. हार्मोन्सच्या बदलांमुळे किंवा शरीरातली साखर वाढल्याने चेहऱ्यावरील त्वचा हळूहळू काळी पडते. त्यामुळे ओठांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.






