
चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
Anti Ageing Collagen Gel: वाढत्या वयात चेहऱ्यावरील चमक कमी होऊन जाते. चेहऱ्यावर सुरकुत्या,पिपंल्स, काळे डाग, मुरुम आल्यानंतर त्वचा खूप जास्त कोमेजून जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर उत्पादनांचा वापर त्वचेसाठी केला जातो. यामुळे काही काळापुरती त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी दिसते. पण काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्वचेच्या समस्या वाढू लागतात. वांरवांर त्वचेसबंधित समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – AI)
प्रत्येकालाच डागविरहीत आणि मऊ हवी असते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. वयाच्या तिशीनंतर चेहऱ्यावर फाईन लाईन्स, पिग्मेंटेशन, सुरकुत्या यांसारख्या समस्या वाढतात. यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होऊन जाते. त्वचेमधील कोलोजन वाढवण्यासाठी आहारात बदल करण्यासोबतच योग्य स्किन केअर रुटीन फाॅलो करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावरील गुलाबी ग्लो वाढवण्यासाठी पिंक जेल बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पिंक जेल तयार करण्यासाठी मोठ्या वाटीमध्ये एलोवेरा जेल, गुलाब पाणी,ग्लिसरीन आणि बिटाची पावडर घेऊन एकत्र मिक्स करा. सर्व पदार्थ मिक्स करताना अजिबात गुठळ्या ठेवू नये. तयार केलेले जेल काचेच्या बरणीमध्ये भरुन ठेवा. पिंक जेल लावण्याआधी चेहरा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर त्वचा कोरडी करुन घ्या. तयार केेलेले जेल हातावर घेऊन पातळ थर चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा खूप जास्त फ्रेश आणि मऊ दिसेल. तयार केलेले जेल रात्रीच्यावेळी आणि मेकअपच्या आधी त्वचेवर लावू शकता.
चेहऱ्यावर पिग्मेंटेशन,सुरकुत्या, डाग कमी करण्यासाठी नियमित चेहऱ्यावर पिंक जेल लावावे. आठवडाभरात त्वचेमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. कोरफड जेल त्वचा हायड्रेट करण्यास मदत करते, तर बीटच्या पावडरचा वापर केल्यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होते. महिनभर नियमित चेहऱ्यावर पिंक जेल लावल्यास त्वचा उजळदार आणि गोरीपान होण्यास मदत होईल.महागड्या नाईट क्रिम्सचा वापर त्वचेसाठी करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा.