Bones Health: केवळ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नाहीतर 'या' कारणांमुळे हाडे होऊ शकतात ठिसूळ, जाणून घ्या सविस्तर
सांध्यांमध्ये वेदना जाणवत असतील तर काय करावे?
सांध्यांमध्ये वेदना कशामुळे होतात?
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्या?
Bones Health: तरुण वयात हाडांसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या वाढू लागतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. पायऱ्या चढताना किंवा उतरताना सांध्यांमधून कटकट आवाज येणे, उठताना सांधे दुखणे किंवा मानेमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी समस्या उद्भवू लागतात. पण कामाच्या धावपळीमध्ये शरीराची जास्त काळजी घेतली जात नाही. आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. हाडांमधून कटकट आवाज येणे ही समस्या असली तरीसुद्धा आवाजासोबत हाडांना सूज किंवा हालचाल करताना त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
Overripe Banana Benefits : जास्त पिकलेली केळी आरोग्यासाठी फायदेशीर? संशोधनातून समोर आली नवी माहिती
मानवी शरीरातील सांध्यांमध्ये दोन हाडांच्या टोकांवर कूर्चा नावाचा गुळगुळीत, लवचिक थर असतो. हा थर हाडांमधील घर्षण कमी करण्याचे आणि हालचाली सहज करण्याचे काम करतो. वाढते वय, सांध्यांना झालेली दुखापत किंवा ऑस्टिओआर्थरायटिससारख्या गंभीर समस्यांपासून सांध्यांमधील गुळगुळीत थराची झीज होते. झीज झाल्यामुळे सांध्यांमध्ये वेदना किंवा हालचाल करताना वेदना जाणवू लागतात. सांध्यांमधील आवज केवळ कूर्चा झिजल्यामुळे येत नाही.
हाडे मजबूत राहण्यासाठी शरीरात आवश्यक प्रमाणात कॅल्शियम असणे फार महत्वाचे आहे. यामुळे हाडे मजबूत राहतात. पण कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास हाडांची घनता कमी होते आणि हाडे ठिसूळ होतात, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात. सांध्यांतून आवाज येणे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकत नाही. हाडांची घनता कमी होणे आणि सांध्यांमधील कूर्चा झिजणे हे दोन वेगवेगळे बदल आहेत.
Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
सांध्यांमध्ये वारंवार वेदना किंवा सूज येत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. वेदना, सूज, आखडलेपणा किंवा चालताना त्रास होत असेल तर भविष्यात शरीरामध्ये गंभीर बदल होऊ शकतात. याशिवाय नियमित शारीरिक हालचाली, पोषक आहार, शरीराचे योग्य वजन आणि सांध्यांवरील अनावश्यक तणाव टाळल्यास हाडांचे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. याशिवाय कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी मी,मेडिकलमधील कोणत्याही गोळ्यांचे सेवन करू नये.
Ans: नाही. कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त व्हिटॅमिन डीची कमतरता, वाढते वय, हार्मोन्समधील बदल, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही आजार किंवा औषधांमुळेही हाडांची घनता कमी होऊ शकते.
Ans: अपुरा पोषक आहार, व्हिटॅमिन डीची कमतरता, धूम्रपान, अतिमद्यपान, व्यायामाचा अभाव, रजोनिवृत्तीनंतर होणारे हार्मोनल बदल आणि अनुवंशिकता ही संभाव्य कारणे आहेत.
Ans: व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. त्याची कमतरता असल्यास हाडांच्या मजबुतीवर परिणाम होऊ शकतो.






