लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कायमची होईल नष्ट! Liver Detox करण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचा समावेश
लिव्हर डिटॉक्स का करावे?
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी पेय?
कॉफी पिण्याचे गुणकारी फायदे?
Liver Detox: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवांकडे व्यवस्थित लक्ष देणे फार आवश्यक आहे. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. अनावश्यक चरबी बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करणे इत्यादी पन्नासपेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर लिव्हरच्या कार्यावर परिणाम होतो. आहारात सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होतात आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याची अजिबात आवश्यकता नसते. आहारातील फायबर, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी महत्वाचे ठरतात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करावा. यामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच लिव्हरच्या कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात या पेयांचा समावेश करावा. उपाशी पोटी गुणकारी पेयांचे सेवन केल्यास महिनाभरात शरीरात अनेक बदल दिसून येतील.
चिया सीड्स आणि लिंबाच्या पाण्याचे मिश्रण सकाळी उठल्यानंतर प्यायल्यास लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होईल. यासाठी वाटीमध्ये थोडस पाणी घेऊन त्यात चिया सीड्स भिजत ठेवावेत. रात्रभर चिया सीड्स भिजल्यानंतर सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि भिजवलेले चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढेल आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल.
ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय यामध्ये असलेले अँथोसायनिन्स शरीरातील पेशींचे रक्षण करते. आंबवलेल्या दुधापासून तयार केलेले ड्रिंक प्यायल्यास प्रोटीन आणि चांगले बॅक्टेरिया शरीराला मिळतील. तसेच उपाशी पोटी आल्याचा रस किंवाडाळिंबाचा रस प्यावा. आल्याच्या रसात असलेले दाहक विरोधी गुणकारी घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा रस प्यावा.
Seeds For Hair: कोणत्या बिया नियमित खाल्ल्याने केसांना मिळेल फायदा, पोषणतज्ज्ञांचा खुलासा
लिव्हरच्या आरोग्यासाठी कॉफी खूप जास्त प्रभावी मानली जाते. यामध्ये असलेले कॅफिन लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. लिव्हरमधील फायब्रोसिस, सिरोसिस आणि लिव्हरच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कॉफी गुणकारी आहे. कॉफीमध्ये कोको मिक्स करून प्यायल्यास फ्लॅव्हेनॉल्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स शरीराला मिळतात.
Ans: साखर न घातलेला चहा किंवा कॉफी, साधे पाणी आणि साखर न घातलेली पेये संतुलित आहाराचा भाग ठरू शकतात.
Ans: ग्रीन टीमधील काही घटकांवर लिव्हरच्या आरोग्याच्या दृष्टीने संशोधन झाले आहे. मात्र, ग्रीन टी हा फॅटी लिव्हरवरील उपचार नाही. ग्रीन टीचे अर्क किंवा जास्त प्रमाणातील सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.
Ans: बीट आणि आवळ्यामध्ये विविध पोषक घटक असतात. त्यांचा संतुलित आहारात समावेश करता येतो; मात्र हे रस लिव्हरमधील चरबी नष्ट करतात, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही.






