Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले आवळ्याचे पाणी, केसांच्या वाढीसाठी अस्सल पारंपरिक उपाय

केसांच्या वाढीसाठी आवळ्याच्या पाण्याच्या वापर करावा. यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणकारी घटक केसांची मूळ मजबूत करण्यास मदत करते आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे पाणी बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2026 | 01:48 PM
'या' पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले आवळ्याचे पाणी

'या' पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले आवळ्याचे पाणी

Follow Us
Follow Us:

जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण, वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली आरोग्यासोबतच केसांच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे तर काहीवेळा टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. तरुण वयात अचानक पांढरे झालेली केस, केस विंचरताना मूठ भरून केस गळणे इत्यादी समस्या उद्भवल्यानंतर महिला गोंधळून जातात. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर, हेअर ट्रीटमेंट तर काहीवेळा केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महागड्या गोळ्या औषध सुद्धा खाल्ल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या

केसांची मूळ कमकुवत झाल्यानंतर केस गळू लागतात. त्यामुळे योग्य वेळी उपचार करणे फार आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी कायमच बाजारत उपलब्ध असलेले हेअर केअर वापरण्याऐवजी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला केसांच्या मुळांवर आवळ्याचे पाणी कशा पद्धतीने वापरावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याच्या सेवनासोबतच केसांच्या मुळांवर आवळ्याचे पाणी लावल्यास केस चमकदार आणि मजबूत होतील. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त घटक अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव करतात. याशिवाय केस मजबूत ठेवण्यासोबतच केस काळेभोर राहतात. केमिकलयुक्त शाम्पूच्या वापरामुळे केसांची नैसर्गिक चमक नष्ट होते, त्यामुळे आवळ्याच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे केसांमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि केस मजबूत, घनदाट होतात.

केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा ‘हे’ आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड

आवळ्याचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, आवळे स्वच्छ धुवून घ्या. टोपात एक लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आवळे घालून पाण्याला उकळी काढून घ्या. पाण्याचा रंग तपकिरीसर झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. तयार केलेले आवळ्याचे पाणी बाटलीमध्ये भरून ठेवा. केस धुवण्याआधी केसांच्या मुळांवर आवळ्याचे पाणी स्प्रे करून काहीवेळ हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १ ते २ तास केस तसेच ठेवून द्या आणि केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. आवळ्याचे पाणी केसांच्या मुळांवर लावल्यास केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आवळ्याचे पाणी केसांसाठी कसे फायदेशीर ठरू शकते?

    Ans: आवळ्यामध्ये व्हिटामिन C आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आवळ्याचे पाणी केस आणि टाळूच्या निगेसाठी उपयुक्त ठरू शकते.

  • Que: केसांवर आवळ्याचे पाणी कसे लावावे?

    Ans: आवळ्याचे पाणी तयार करून ते थंड झाल्यानंतर टाळू आणि केसांच्या मुळांवर हलक्या हाताने लावावे. काही वेळाने केस साध्या पाण्याने धुवू शकता.

  • Que: आवळ्याचे पाणी केसांच्या वाढीसाठी उपयोगी आहे का?

    Ans: आवळ्याचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी पूरक ठरू शकते; मात्र केसांची वाढ वाढवण्याबाबत ठोस परिणाम व्यक्तीनुसार वेगळे असू शकतात.

Web Title: Apply amla water rich in ayurvedic properties to your hair using this method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • amla for hair
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर
1

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या
2

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या

उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात? पचनक्रिया आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीने खा कढीपत्ता
3

उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात? पचनक्रिया आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीने खा कढीपत्ता

केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा ‘हे’ आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड
4

केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा ‘हे’ आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.