केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा 'हे' आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड
मागील काही वर्षांमध्ये फॅशन, ब्युटी इत्यादी अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. शॉर्ट केंसाऐवजी सगळ्यांचं लांबलचक, घनदाट आणि मजबूत केस हवे आहेत. त्यामुळे सुंदर केसांसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण जीवनशैलीतील बदल, झोपेची कमतरता, पोषक घटकांचा अभाव आणि आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे केसांना आवश्यक पोषण मिळत नाही. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी हेअर सीरम लावून केसांची काळजी घेतली जाते. पण या सगळ्याचा फारसा परिणाम केसांच्या गुणवत्तेवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
केसांची मूळ कमकुवत झाल्यानंतर केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. केस विंचरताना कंगव्यात येणारा गुंता पाहून महिलांना खूप जास्त भीती वाटते. केस गळू टक्कल पडेल की काय अशी माहिती सुद्धा काहींच्या मनात निर्माण होते. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेल्या या तेलाचा वापर केसांसाठी केल्यास केस मजबूत होणयासोबतच घनदाट सुद्धा होतात आणि केस गळणे थांबते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
बाजारात कुठेही रोजमेरी सहज उपलब्ध होते. रोजमेरी ही केवळ आयुर्वेदिक वनस्पती नसून एसेन्शियल ऑइल सुद्धा आहे. रोजमेरी ऑइलने स्कॅल्पवर मसाज केल्यास केसांच्या समस्या कमी होण्यासोबतच रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत भरपूर ऑक्सिजन आणि आवश्यक पोषण पोहचते. रोजमेरीमध्ये हार्मोनचा प्रभाव कमी करणारे आवश्यक घटक असतात. त्यामुळे टाळूवर वाढलेले इन्फेक्शन, कोंडा आणि केस गळती थांबवण्यासाठी रोजमेरीचा वापर करावा. रोजमेरी तेल खूप जास्त घट्ट असते, त्यामुळे केसांवर थेट लावू नये. यामुळे कोणतेही इतर तेल मिक्स करून लावावे. यामुळे केस खूप जास्त तेलकट होत नाहीत.
वाटीमध्ये रोजमेरी तेल घेऊन त्यात खोबरेल तेल आणि जोजोबा ऑइल किंवा बदामाचे तेल मिक्स करून लावू शकता. तयार केलेले तेल केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून काहीवेळ तसेच ठेवा किंवा रात्रभर केसांमध्ये तसेच ठेवून द्या. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर केस सौम्य शाम्पूचा वापर करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास महिनाभरात केस घनदाट आणि मजबूत होतील. केसांना तेल लावण्यासोबतच पोषक आहार आणि भरपूर पाणी पिणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
Ans: भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद आणि नारळाच्या तेलावर आधारित आयुर्वेदिक तेलांचा नियमित वापर केसांचे पोषण करण्यास मदत करू शकतो.
Ans: आयुर्वेदिक तेल टाळूचे पोषण करण्यास आणि केस तुटणे कमी करण्यास मदत करू शकते. मात्र, केसांची जाडी आणि वाढ यावर आनुवंशिकता, आहार आणि आरोग्याचाही प्रभाव असतो.
Ans: केस कमकुवत असणे, कोरडेपणा, पोषणाची कमतरता, ताण किंवा चुकीची हेअर केअर पद्धत यामुळे विंचरताना केस अधिक गळू शकतात.






