आठवडाभर नियमित केसांना लावा कांद्याचा रस!
मागील अनेक वर्षांपासून केसांसंबधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. ज्याप्रमाणे रुग्णालयात किडनी, लिव्हर आणि हृदयाच्या आजाराचे रुग्ण आहेत. तसेच त्वचा आणि केसांसंबधित समस्यांनी त्रस्त असलेले रुग्ण वाढले आहेत. हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पुरुषांचे केस गळून हळूहळू टक्कल पडू लागते. केसांमध्ये पडलेले टक्कल काहीवेळा आत्मविश्वास पूर्णपणे कमी करून टाकतो. त्यामुळे केसांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक नेहमीच दुर्लक्ष करतात, पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. केसांच्या वाढीसाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट सुद्धा आहेत. या ट्रीटमेंट केल्यामुळे काहीकाळ केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ त्वचेसाठी ठरतील वरदान! पिंपल्स, मुरूम होतील कायमचे गायब
केसांच्या वाढीसाठी बाजारातील महागड्या ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी. केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी मानला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. याशिवाय जेवताना सुद्धा अनेक लोक कच्च्या कांद्याचे सेवन करतात. कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते. यासोबत केसांच्या मुलांना मुळांना पोषण मिळते. केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कायमच घरगुती उपाय करावे. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडासुद्धा कमी होतो. आज आम्ही तुम्हाला केसांना कांद्याचे तेल लावल्यामुळे नेमके काय काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
हल्ली कमी वयातच अनेकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. पोषक घटकांचा अभाव आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. ज्यामुळे बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवते. अशावेळी कांद्याच्या रसाचा वापर केसांसाठी करावा. कांद्याच्या रसात कॅटालेज नावाचे एंझाइम आढळून येते, जे केसांमधील हायड्रोजन पॅरॉक्साइडला तोडून टाकते. ज्यामुळे हळूहळू केस पांढरे होतात. अशावेळी कांद्याच्या रसाचा वापर करावा. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.
शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर केस अचानक तुटणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यास कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिक्स करून लावावे. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. महागड्या हेअर ट्रीटमेंट करताना वापरले जाणारे केराटिन प्रोटीन सल्फर बनवले जाते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केसांना कांद्याचा रस लावावा.