पावसाळ्यात वाढलेली केसगळती थांबवेल 'हे' औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले तेल
वर्षाच्या बाराही महिने महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस गळतात. केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा इत्यादी अनेक समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारातील वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कोणत्याही हेअर केअर क्रीम किंवा सीरम लावण्याआधी ते केसांना व्यवथित सूट होईल की नाही याची योग्य ती खात्री करून घ्यावी. बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर केअर प्रॉडक्टमध्ये हानिकारक केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. मात्र यामुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच खराब आणि निस्तेज होऊन जातात. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी महिला नेहमीच हेअरपॅक किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतात.(फोटो सौजन्य – istock)
नियमित करा ‘या’ लाल फळाच्या रसाचे सेवन! केसांच्या वाढीसाठी ठरेल वरदान, कायमच दिसतील सुंदर केस
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे किंवा टाळूवरील इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. कारण पावसाचे पाणी केसांमध्ये गेल्यानंतर केस ओले राहतात आणि कोंडा वाढतो. कोंडा झाल्यानंतर केस गळू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची जास्त घ्यावी. पावसाळ्यात केस गळतीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा. केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. एरंडेल तेल केसांच्या मुळांना पोषण देते, ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. पावसाळ्यात वाढलेली केस गळती थांबवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा.
वातावरणातील आर्द्रतेचा पाणी केसांवर लगेच दिसून येतो. ज्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळती थांबवण्यासाठी एरंडेल तेलात कांद्याचा रस. मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने मिक्स करून तेल तयार करावे. तयार केलेले तेल हलकेसे गरम झाल्यानंतर केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करून घ्यावा. रात्री झोपण्याआधी नियमित तेलाचा वापर केल्यास महिनाभरात चांगला फरक दिसून येईल. रात्रभर तेल केसांमध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर सकाळी उठून शँम्पूने केस स्वच्छ करून घ्यावे.
Anti-Aging Treatment: अँटी एजींग ट्रिटमेंटसाठी पाच कोटींचा खर्च; पण पुढे जे झालं ते…..
केसांच्या मुळांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात. तसेच एरंडेल तेलाचा वापर केल्यामुळे केसांच्या मुळांना खोलवर पोषण मिळते आणि केस गळत सुद्धा नाहीत. मागील अनेक वर्षांपासून केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर केला जात आहे. मेथीचे दाणे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करतात आणि केसांवरील नैसर्गिक चमक वाढवतात.