स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ त्वचेसाठी ठरतील वरदान!
लहान मुलींपासून ते अगदी म्हतारपणात सुद्धा त्वचेवर मोठ्या प्रमाणात पिंपल्स आणि त्वचेसंबंधित इतर समस्या उद्भवतात. त्वचा कायमच तरुण आणि तेजस्वी राहावी असे प्रत्येक महिलेला नेहमीच वाटते. त्वचा सुंदर आणि गोरीपान करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र आहारात होणारे बदल, मासिक पाळी, हार्मोनल बदल, धूळ, प्रदूषणामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. त्वचेवर आलेले पिंपल्स महिला नखांनी किंवा टोकदार वस्तूचा वापर करून फोडतात. मात्र यामुळे त्वचेवरील पिंपल्स आणखीनच वाढतात, ज्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महागड्या क्रीम किंवा स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. हे स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेची गुणवत्ता सुधरण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत केमिकल प्रॉडक्ट किंवा हानिकारक रसायनांचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि उठावदार दिसते. त्वचेची चमक वाढवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. हे पदार्थ नियमित वापरल्यास महिनाभरात फरक दिसून येईल.
प्रत्येक घरात लिंबू असतोच. जेवणातील पदार्थ बनवताना किंवा सरबत बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबूच्या रसात असलेले घटक त्वचेवर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात बेसन टाकून मिक्स करावे. त्यानंतर तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावून काहीवेळ ठेवून त्वचानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला लालसरपणा, जळजळ आणि त्वचेवर वाढलेले डाग कमी होण्यास मदत होते.
भजी किंवा पुरी बनवताना बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. तसाच वापर तुम्ही त्वचेसाठी सुद्धा करू शकता. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तसेच मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात तुम्ही लिंबाचा रस टाकून मिक्स करू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणा, जळजळ आणि मुरूम कमी होण्यास मदत होते.
अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी ठरतो. यासाठी वाटीमध्ये किसलेल्या बटाट्याचा रस घेऊन नंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. १० मिनिटानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि लालसरपणा कमी होतो.