तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात? मग 'या' सवयींमध्ये करा बदल, त्वचेवर खुलून येईल सौंदर्य
हल्ली सगळ्यांचं चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. सुंदर दिसण्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर, महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, फोड, ऍक्ने इत्यादी अनेक समस्या वाढतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकतात. धूळ, माती, प्रदूषण, चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट आणि आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे त्वचेचे नुकसान होते. तर काहीवेळा तरुण वयातच चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात. प्रीमॅच्युअर एजिंगची समस्या उद्भवल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता जीवनशैलीतील चुकीच्या सवयी बदलणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला तरुण वयात चेहऱ्यावर कोणत्या कारणांमुळे पिंपल्स, फोड आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जीवनशैलीत केलेल्या छोट्या मोठ्या चुका शरीरासाठी अतिशय घातक ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
कामाच्या धावपळीमध्ये काहीजण पाणी पिणेच विसरून जातात. दिवसभरात तीन लिटर पेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्या येणे, पिंपल्स इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नियमित ३ लिटर पेक्षा जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. यामुळे तुम्ही वयापेक्षा जास्त म्हातारे दिसता.
फ्रिजमध्ये साठवून ठेवलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. काहींना सतत पिझ्झा, बर्गर, पास्ता किंवा मैद्याचे पदार्थ खाण्याची सवय असते. सतत मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढतो आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. जास्त गोड पदार्थ, पॅक्ड आणि जंक फूड खाल्ल्यामुळे त्वचा आणि केस कोरडे पडतात.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात. याशिवाय शांत झोप घेतल्यामुळे त्वचा खूप फ्रेश राहते. पण झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांखाली काळी वर्तुळ येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या वाढल्यास दुर्लक्ष न करता जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.
सुंदर दिसण्यासाठी काय खावं? सकाळपासून रात्रीपर्यंत हा डाएट चार्ट फॉलो करा; नॅचरली चेहरा राहील चमकदार
शारीरिक आणि मानसिक तणाव वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे नेहमीच तणावपूर्ण जीवनशैली जगणे आवश्यक आहे. मानसिक तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव किंवा शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे मन आनंदी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम किंवा प्राणायम करावे.






