
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड वेदना होतात? मग आजीबाईच्या बटव्यातील 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा
मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची कारणे?
आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय?
मासिक पाळी लवकर येण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येणे ही महिलांच्या शरीरात होणारी नैसर्गिक क्रिया आहे. महिन्यातील ४ ते ५ दिवस प्रत्येक महिलेला मासिक पाळी येते. पाळीच्या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक तणाव निर्माण होतो. तसेच काहीवेळा मासिक पाळी आल्यानंतर पोटात खूप जास्त वेदना होतात, कंबर दुखणे, उलट्या होणे, मळमळ इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. पीसीओडी, थायरॉईड किंवा रक्ताची कमतरता इत्यादी आजारांचा परिणाम मासिक पाळीवर लगेच दिसून येतो. महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळी आल्यानंतर महिलांना खूप जास्त त्रास होतो.(फोटो सौजन्य – istock)
पोटात आणि कंबरेत वाढलेल्या असह्य वेदना शरीराचे गंभीर नुकसान करतात. पोटात वेदना किंवा कंबर दुखल्यास अनेक महिला मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण सतत पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दैनंदिन आहारात लोह आणि कॅल्शियम वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. यामुळे शरीरातील रक्ताची पातळी सुधारते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या चक्रात बदल होत असेल तर वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. यामुळे मासिक पाळी वेळेत येऊन आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात नियमित पपईचे सेवन करावे. पपईमध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक घटक गर्भाशयातील स्नायूंना घट्ट करतात आणि आकुंचन पावण्यास मदत करतात. थांबलेली मासिक पाळी लवकर येण्यासाठी नियमित पपई खावी. नियमित पपईचे सेवन केल्यास पाळीच्या चक्रात लक्षणीय सुधारणा होते. पपईमध्ये कॅरोटीन शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी उत्तेजित होते आणि प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अननस खायला खूप जास्त आवडतो. मासिक पाळीतील रक्त प्रामुख्याने गर्भाशयाच्या भिंतीच्या अस्तराच्या गळण्यामुळे तयार होते. हा थर मऊ होण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. अननसमध्ये असलेले ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यास मदत करते. याशिवाय अननस खाल्ल्यामुळे रक्तभिसरण सुधारते.
हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा अदरक-मधाचा चहा; प्रत्येक घोटात मिळेल आराम
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आल्याचा चहा प्यावा. आल्याचा चहा उष्ण असतो. यामुळे मासिक पाळी सुलभ होते. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म पाळीतील सूज आणि वेदनांपासून आराम मिळवून देते. याशिवाय सर्दी खोकला झाल्यानंतर कोणत्याही सिरप किंवा गोळीचे सेवन करण्याऐवजी आल्याचा रस प्यावा. यामुळे घशात वाढलेल्या वेदनांपासून सुटका मिळते. मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर दैनंदिन आहारात वेगवेगळ्या उष्ण आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
Ans: दर महिन्याला गर्भाशयाचे अस्तर तुटून योनीमार्गे रक्तस्त्राव होण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी म्हणतात.
Ans: सामान्य पाळी २१ ते ३५ दिवसांची असते. जर अपेक्षेपेक्षा ७ दिवस किंवा त्याहून अधिक काळ पाळी आली नाही, तर ती उशिरा (Late Period) मानली जाते.
Ans: आयोडीन, लोह (Iron), कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि फोलेट युक्त आहार घ्यावा. तसेच, फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.