
'या' पदार्थांपासून घरीच तयार करा बर्फाचे तुकडे, आठवडाभरात चेहऱ्यावर येईल कोरियन ग्लास स्किन ग्लो
रोजच्या घाईगडबडीमुळे त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर त्वचेवर अनेक बदल दिसून येतात. चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि ऍक्ने कमी करण्यासाठी महिला वारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जाते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण सतत केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्यामुळे उतार वयात त्वचा खूप जास्त म्हातारासारख्या दिसू लागते. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेवर वारंवार येणारे पिंपल्स, मुरूम आणि बारीक पुरळ कमी करण्यासाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांचा वापर करून मॅजिकल आइस क्यूब्स बनवण्याची कृती सांगणार आहोत. नियमित बर्फाचा एक खड्डा त्वचेवर फिरवल्यास कोरियन महिलांप्रमाणे चमकदार आणि सुंदर त्वचा दिसेल.(फोटो सौजन्य – istock)
सुंदर दिसण्यासाठी काय खावं? सकाळपासून रात्रीपर्यंत हा डाएट चार्ट फॉलो करा; नॅचरली चेहरा राहील चमकदार
त्वचेसाठी आइस थेरीपी चांगली समजली जाते. यामुळे सैल झालेली त्वचा घट्ट होते आणि चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी होतात. चेहऱ्यावर नियमित बर्फ फिरवल्यास त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. बर्फामुळे चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद होतात आणि त्वचेची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे साध्या पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ करण्याऐवजी बर्फाच्या पाण्याने त्वचा धुवावी. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक चेहऱ्यावरील सौंदर्य कायम टिकवून ठेवतात. बीटचे आईस क्यूब बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बीटचा रस घेऊन त्यात थोडस पाणी मिक्स करा. तयार केलेले मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून घ्या. ५ ते ६ तास बर्फ फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. नियमित एक बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर फिरवल्यास गुलाबी ग्लो येईल. बीटच्या वापरामुळे पिग्मेंटेशन, त्वचेचा रंग आणि काळे डाग कमी होण्यास मदत होईल.
तांदळाच्या पाण्याचे आईस क्यूब बनवण्यासाठी, टोपात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ टाकून शिजवून घ्या. घट्टसर मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर पाणीआईस ट्रेमध्ये ओतून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. नियमित बर्फाचा एक तुकडा त्वचेवर फिरवल्यास त्वचा मऊ होऊन त्वचेचा रंग सुधारेल.
झोपण्यापूर्वीचा Mental Detox : शांत झोपेसाठी आधी मनाची करा स्वच्छता, अशी झोप लागेल की…
वाढत्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात. हे फोड त्वचेचे गंभीर नुकसान करतात. अशावेळी कोरफडचा रस बर्फाच्या ट्रेमध्ये ओतून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. नियमित चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी होईल आणि त्वचेची गुणवत्ता सुधारेल. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावावा.