
Archana Puran Singh 'या' दुर्मिळ आजाराने त्रस्त! गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांना ‘लाफ्टर क्वीन’ या नावाने ओळखले जाते. ‘द कपिल शर्मा शो’ मधून प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. तिचा अभिनय सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पण सध्या तिच्यावर अतिशय कठीण प्रसंग उद्भवला आहे. काही दिवसांआधी अर्चना यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना गंभीर आणि दुर्मिळ आजाराची लागण झाली. त्यांच्या मुलांना सोशल मीडियावर भावुक होत आईच्या गंभीर आजाराबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. काही दिवसांआधी अर्चना यांच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यामध्ये त्यांचे हाड फ्रॅक्चर झाले. फ्रॅक्चर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान, त्यांना ‘कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम’ सारख्या अतिशय दुर्मिळ आणि गंभीर आजाराचे निदान झाले. या आजाराची लागण झाल्यानंतर ज्या ठिकाणी दुखापत झाली असेल तिथे वेदना, सूज आणि नसांमध्ये प्रचंड जळजळ होऊन शारीरिक आरोग्य बिघडते. चला तर जाणून घेऊया कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम म्हणजे? या आजाराची लक्षणे आणि कारणे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल
अर्चना यांच्या मुलांना व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, आईच्या हातांची स्थिती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे की तिला दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे तिच्या हाताच्या हालचालींवर मर्यादा येण्याची जास्त शक्यता असते. तिला कायमस्वरूपी वेदना सहन कराव्या लागू शकतात. माझ्या आईने आयुष्यभर आम्हाला हसवले आहे, पण आज तिला अशा वेदनेत पाहणे माझ्यासाठी खूप कठीण आहे.” असे म्हणत दुःख व्यक्त केले आहे.
कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम हा आजार हात किंवा पायाला दुखापत झाल्यानंतर होतो. या आजाराच्या वेदना सामान्य आजारापेक्षा अधिक तीव्र आणि त्रासदायक असतात. लहानशी जखम किंवा दुखापत झाल्यानंतर ती लवकर बरी होते, पण कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसू लागतात. हा आजार लवकर बरा होत नाही. काही रुग्णांमध्ये ही समस्या कायमस्वरूपी टिकून राहते.
कॉम्प्लेक्स रीजनल पेन सिंड्रोमसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. याशिवाय आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना प्रभावित भागाची हालचाल आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी फिजिओथेरेपी आणि व्यावसायिक थेरेपी दिली जाते. याशिवाय स्नायूंच्या वेदना कमी होतात. मेंदूला प्रभावित भागाबद्दलची धारणा बदलण्यास मदत करण्यासाठी आरसा वापरून उपचार दिले जातात. यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या तीव्र वेदना कमी होऊन आरोग्य सुधारते.
Ans: कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम (CRPS) ही एक जुनाट वेदनादायक स्थिती आहे, जी सहसा हात किंवा पायाला होते आणि दुखापत किंवा शस्त्रक्रियेनंतर सुरू होते. यात दीर्घकाळ वेदना, सूज आणि त्वचेमध्ये बदल होतात.
Ans: दुखापत (फ्रॅक्चर, प्लास्टर), शस्त्रक्रिया, स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्यानंतर विकसित होते. यात मज्जासंस्थेतील असामान्य प्रतिसाद कारणीभूत असतो.
Ans: जळजळीसारखी तीव्र, सततची वेदना.प्रभावित अवयवामध्ये सूज येणे