खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा 'या' पदार्थांचे सेवन
अॅसिडिटी होण्याची कारणे?
पित्त शांत करण्यासाठी काय खावे?
अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
दीर्घकाळ कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी शरीराची पचनसंस्था सुरळीत चालू असणे फार महत्वाचे आहे. अन्यथा संपूर्ण जीवनशैली विस्कळीत होऊन जाते. पचनाच्या समस्या वारंवार उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांसोबतच इतर अनेक उपाय केले जातात. पण दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर ते व्यवस्थित पचन न झाल्यास पुन्हा एकदा अन्ननलिकेमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. आतड्यांमध्ये वाढलेला गॅस, पित्त, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या मसाल्याचे सेवन केल्यास शरीराला तात्काळ आराम मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल
बऱ्याचदा लोक पोटात वाढलेला गॅस आणि पोट दुखीपासून आराम मिळवण्यासाठी गोळ्यांचे सेवन करतात. पण सतत गोळ्या औषध खाल्ल्यामुळे आतड्यांचे कार्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचे सेवन करून शरीराचे कार्य सुरळीत चालू ठेवावे. आज आम्ही तुम्हाला खवळलेले पित्त शांत करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे आठवड्यातून एकदा सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस बाहेर पडून जाईल आणि उलट्या, मळमळपासून आराम मिळेल. मसाल्यांचे सेवन केल्यामुळे पोटाचे कार्य सुरळीत चालू राहते आणि शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. हळदीमध्ये असलेले ‘कर्क्युमिन’ आतड्यांमध्ये वाढलेली जळजळ कमी करतात आणि आतड्यांमध्ये चांगले जीवाणू वाढवतात. रात्री झोपण्याआधी नियमित हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी होईल आणि रात्री गाढ झोप लागेल. यासोबतच आल्याच्या सेवनामुळे ऍसिडिटी आणि अपचनाची समस्या कमी होते. आल्याच्या सेवनामुळे पोटातील अन्न लगेच पुढे सरकते आणि पचनक्रिया सुरळीत चालू राहते. उलट्या, मळमळ इत्यादी त्रासांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आल्याचा रस प्यावा.
जेवणानंतर नियमित बडीशेप खाल्ल्यास खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होईल. बडीशेप खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस बाहेर पडून जाईल आणि पोटात वाढलेला जडपणा कमी होईल. तसेच सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचे पाणी प्यावे. जिऱ्याच्या पाण्यात असलेले गुणकारी घटक आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करते. वारंवार पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी प्यावे. यामुळे पोटात हलके वाटेल.
दालचिनी हा सुगंधी मसाला जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. दालचिनीच्या सेवनामुळे आतड्यांची हालचाल सुलभ चालू राहते. तसेच रक्तातील साखरेची पातळी कायमच नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करावे. दालचिनीचा वापर ओट्स, कॉफी किंवा काढा बनवताना केला जातो. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
Ans: जेव्हा पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत येते, तेव्हा ही समस्या उद्भवते. याला ऍसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ असेही म्हणतात.
Ans: वारंवार आंबट ढेकर येणे, छातीत आणि घशात जळजळ होणे.
Ans: नारळ पाणी ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते.






