Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान वयात चेहऱ्यावर सुरकुत्या- बारीक रेषा दिसू लागल्यात? मग शहनाज हुसैनने सांगितला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचा दिसेल वयापेक्षा तरुण

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी कायमच घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो आणि त्वचा अधिक सुंदर होते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2025 | 01:45 PM
लहान वयात चेहऱ्यावर सुरकुत्या- बारीक रेषा दिसू लागल्यात? मग शहनाज हुसैनने सांगितला 'हा' उपाय नक्की करा

लहान वयात चेहऱ्यावर सुरकुत्या- बारीक रेषा दिसू लागल्यात? मग शहनाज हुसैनने सांगितला 'हा' उपाय नक्की करा

Follow Us
Follow Us:
  • तरुण चेहऱ्यावर सुरकुत्या का येतात?
  • चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावेत?
  • त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?
पूर्वीच्या काळी वयाच्या साठीनंतर महिलांच्या शरीरात आणि त्वचेवर अनेक बदल दिसून यायचे. मात्र हल्ली जीवनशैलीच्या बदलांमुळे तरुण वयातच त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवू लागल्या आहेत. तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी मेकअप, स्किन केअर प्रॉडक्ट आणि इतरही अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जात आहे. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा वयापेक्षा खूप जास्त म्हतारी आणि वयस्कर दिसू लागते. मेकअप केल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावरील बारीक रेषा दिसून येतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर क्रीमचा आणि महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण यामुळे त्वचा तरुण दिसण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

या तीन पैकी कोणत्याही एका ड्रिंकचे नियमित सेवन करा, काचेसारखा चकाकेल चेहरा; शरीरालाही आतून ठेवेल स्वछ

तरुण वयात चेहऱ्यावरील चमक कमी झाल्यानंतर महिलांमध्ये तणाव आणि चिंता वाढते. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच आनंदी राहणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी शहनाज हुसैनने सांगितलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावरील बारीक रेषा दिसत नाहीत. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडल्यानंतर मॉईश्चरायजर लावणे आवश्यक आहे.

मध आणि लिंबू:

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचेच्या सर्वच समस्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल. मधात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिक उजळदार होते आणि सुंदर दिसते.

कोरफड जेल:

थंडीच्या दिवसांमध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोरफड जेल चेहऱ्यावर लावावे, कोरफड जेल चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका. कोरफड जेल लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. याशिवाय चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी कोरफड जेल लावावे.

घामाची दुर्गंधी होईल कायमची दूर! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नियमित करते ‘या’ ड्रिंकचे सेवन, कायम राहाल फ्रेश

चंदन आणि हळद:

जेवण बनवताना पदार्थांचा रंग आणि चव वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीच्या वापरामुळे त्वचेवर आलेले काळे डाग, पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होते. यासाठी वाटीमध्ये हळद आणि चंदन पावडर एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळा ठेवून नंतर स्वच्छ धुवून टाका. चंदन पावडर लावल्यामुळे चेहऱ्यावरील तेल नियंत्रणात राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Are wrinkles and fine lines appearing on the face at a young age then shahnaz hussain said to do this solution for sure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.