(फोटो सौजन्य: Instagram)
तुमच्या त्वचेला केवळ बाह्य पोषणाचीच नव्हे तर अंतर्गत पोषणाची देखील आवश्यकता आहे. यासाठी काही हेल्दी ड्रिंक्सचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करु शकता. इंस्टाग्रामवर आहारतज्ज्ञ कशिश मेहता यांनी तीन प्रभावी हेल्ही डिटॉक्स ड्रिंक्सविषयीची माहिती शेअर केली आहे. या ड्रिंक्सचा आपल्या आहारात समावेश करुन तुम्ही तुमच्या त्वचेचे तसेच अंतर्गत शरीराचे आरोग्य सुधारु शकता. हे ड्रिंक्स शरीरातील अशुद्धता बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. हे त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
बीटाचा रस
बीटामध्ये असे काही पोषक घटक आढळून येतात जे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेला नैसर्गिक गुलाबी चमक येण्यास मदत होते आणि शरीरात रक्ताभिसरण सुरळीत चालू राहते. बीटाचे हे पेय तयार करण्यासाठी सर्वप्रथम बीट, त्यानंतर पुदिना आणि लिंबू एक ग्लास पाण्यात किंवा बाटलीत भरा. सर्व घटक नीट एकत्र करा आणि काही मिनिट असेच सर्व साहित्यांना भिजन ठेवा. रोज सकाळी तुम्ही या पाण्याचे सेवन करु शकता.
बडीशेप पाणी
व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक तत्वे आढळून येतात जे त्वचा स्वच्छ करण्यास आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात. बडीशेपपासून हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी बडीशेप, सेलेरी आणि किसलेले आले एकत्र करून त्यांना पाण्यात काहीवेळ भिजवून ठेवा. असं केल्याने या घटकांमधील पोषक घटक पाण्यात चांगले विघळले जातील.
काकडी ज्यूस
काकडी शरीराला थंडावा मिळवून देण्याचे आणि हायड्रेट ठेवण्याचे काम करते. यापासून ड्रिंक तयार करण्यासाठी काकडी, चिया सीड्स आणि लिंबू पाण्यात घाला. काहीवेळ हे पाणी तसेच बाजूला ठेवा, जोपर्यंत बिया पाण्यात भिजून फुगत नाही. रोज सकाळी तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता, हे त्वचेला आराम देण्यास आणि त्वचा मऊ बनवण्यास मदत करते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






