घामाची दुर्गंधी होईल कायमची दूर! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नियमित करते 'या' ड्रिंकचे सेवन
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये अंगाला खूप जास्त घाम येतो. दिवसभर काम, शारीरिक हालचाली, शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. घाम आल्यानंतर शरीर पूर्णपणे भिजून जाते. हाच घामाचा थर त्वचेवर तसेच चिटकून राहतो, ज्यामुळे अंगाला दुर्गंधीचा कुबट वास येतो. काहीवेळा घामाचा वास इतका तीव्र येतो की शरीराला खूप जास्त दुर्गंधी येते. बऱ्याचदा घामाच्या कुबट वासामुळे चारचौघांमध्ये गेल्यानंतर खूप लाजिरवण्यासारखे वाटते. याशिवाय घामाच्या दुर्गंधीमुळे त्वचेला खाज येणे, त्वचा लाल होणे, त्वचेवर रॅश येणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. घामाचा वास आल्यानंतर महिला वेगवेगळे परफ्युम किंवा डिओ अंगाला लावतात. पण वारंवार परफ्युम किंवा डिओ लावल्यामुळे त्वचेवर इन्फेकशन होण्याची शक्यता असते. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – pinterest)
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या अभिनयामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. तिने तिच्या सौंदर्याने साऱ्यांचं भुरळ पडली आहे. सर्वच महिलांना घामाच्या दुर्गंधीचा सामना करावा. या दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी जॅकलिन घरगुती उपाय करते. जॅकलिनने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, बॉडी ओडर कंट्रोल करण्यासाठी खास घरगुती ड्रिंक पिते. यामुळे घामाचा शरीराला वास येत नाही. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री जॅकलिन घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या ड्रिंकचे सेवन करते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ड्रिंकचे सेवन केल्यास आठवडाभरात तुम्हाला फरक दिसून येईल.
बदामाचे दूध, गुलाबाच्या पाकळ्या, वेलची,दालचिनी, लवंग, चक्रफूल, मेपल सिरप
बॉडी ओडर कंट्रोल ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यात बदाम दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात दालचिनीचा बारीक तुकडा, लवंग, चक्र फुल घालून मंद आचेवर दूध शिजवून घ्या. सगळ्यात शेवटी दुधाची चव वाढवण्यासाठी त्यात मेपल सिरप टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले दूध गाळून सेवन करावे. हे ड्रिंक नियमित प्यायल्यास घामाच्या दुर्गंधीपासून कायमची सुटका मिळेल आणि शरीर फ्रेश राहील. घरगुती आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बऱ्याचदा घामावाटे बाहेर पडून जातात, ज्यामुळे अंगाला खूप जास्त वास येतो. हा वास कमी करण्यासाठी आहारात बदल करण्यासोबतच शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. नियमित दोन वेळा अंघोळ करणे, शरीर स्वच्छ पुसणे इत्यादी गोष्टी फॉलो केल्यास घामाच्या दुर्गंधीपासून आणि त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळेल.






