गणेशचतूर्थी ही तासांवर आली, त्यामध्ये भाविकांची मोठ्या प्रामाणत बाजारात गर्दी , गणपतीच्या सजावटीसाठी बाजारापेठा फुल्या आहेत. सगळ्यात जास्त भाविकांची इको-फ्रेंडली वस्तू गोष्टीकडे विशेष लक्ष देतामा दिसत आहे. वस्तू पासून मूर्ती घेण्यापर्यंत, वस्तू आपल्या कडे लगेच ओळखली जाऊ शकते, पण गणरायची मूर्ती ओळखणे थोडे कठीण जाते, त्यासाठी काही खास टिप्स…
पर्यावरण पूरक म्हणून मातीच्या गणपती मूर्तीची ओळख आहे. तर, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती पर्यावरणाला हाणी पोहोचवतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्तीवर बंदी आणूनही या मूर्ती हद्दपार होताना दिसत नाही. यावर्षी देखील हीच परिस्थिती आहे. मातीची मूर्ती निवडण्यापूर्वी याबाबी लक्षात घेतल्या पाहिजे. अनेक गणेश भक्त पर्यावरण राखण्याचा दृष्टिकोन आणि मूर्ती विसर्जित करताना विघ्न येऊ नये म्हणून मातीच्या मूर्तीच्या शोधात असतात.
मूर्तीच्या मागे छिद्र : पीओपी मूर्तीच्या तुलनेत मातीची मूर्ती तयार केल्यानंतर वाळायला वेळ लागतो. तयार केलेली मूर्ती आतमधून योग्य पद्धतीने सुकावी, भेगा पडू नये म्हणून मूर्तीला मागे एक छिद्र ठेवण्यात येते. तर, पीओपी मूर्तीला असे छिद्र असत नाही.
प्रत्येक मूर्तीमध्ये विविधता : मातीची मुर्ती बनविताना पूर्णपणे साचा वापरला जात नाही. त्यामुळे, धडापासून मूर्तीचे सर्व अवयव दूरदूर दिसतात. मूर्तीवर असलेला उंदीर देखील चिकटलेला दिसत नाही. पीओपीमूर्ती साचा वापरून तयार करण्यात येत असल्याने उंदीर मूर्तीला पूर्णपणे चिकटलेला दिसतो.
लाकडी पाटाचा वापर : मातीची मूर्ती हाताने बनविण्यात येत असल्याने ती बनवताना शक्यतो लाकडी पाटाचा वापर केला जातो.
मूर्तीचे वजन : पीओपी मूर्ती हलकी व मातीची वजनदार असते. हे ओळख लपविण्यासाठी मूर्तीच्या तळात वजनदार वस्तू भरल्या जाते. अशावेळी थोडे कोरल्यास आतील अवजड वस्तू नजरेस पडतील. पूर्ण मातीच दिसल्यास ती मुर्ती शुद्ध मातीची असेल.
मूर्तीची चमक : पीओपी मूर्ती अधिक चमकदार आणि मातीची मूर्ती कमी चमकदार दिसते. हा फरक निरखून पाहावा. माती मूर्तीबाबत गणेश भक्त मोठ्या प्रमाणात जागरूक झाले आहेत. मात्र, पीओपी विक्रेत्यांकडून शाडू मातीची मूर्ती सांगून विक्री केली जाते. या फसवणुकीपासून भक्तांनी सावध राहायला हवे.