सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्च करून महानगरपालिकेने सांगलीतील कळ्या खणीमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी संगीतावर चालणारा रंगीबेरंगी कारंजा उभा केलाय. परंतु हा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आयुक्त सत्यम गांधी यांनी हा प्रकल्प बेकायदेशीरपणे आणि अतिक्रमण करून उभारलाय शिवाय यामधील पाण्यात मलमूत्र मिसळले जाते ड्रेनेचे पाणी मिसळले जाते त्यामुळे हे पाणी दूषित झाले असून सध्या या पाण्याची दुर्गंधी येत आहे असे पाणी वाऱ्याच्या झोतामुळे कारंजाच्या माध्यमातून लोकांच्या नाका तोंडात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे सांगत नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती, आणि शिवसेनेच्या वतीने या दूषित पाण्यापासून वाचण्यासाठी पीपीई किट घालून सदर कारंजा पाहत अनोखे आंदोलन केले.
.