Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयातच गुडघ्यांमधून उठता-बसता कटकट आवाज येतो? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, हाडांना मिळेल भरून पोषण

तरुण वयात हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय एक ग्लासभर दुधात हळद, दालचिनी पावडर आणि सुंठ पावडर एकत्र मिक्स करून प्यायल्यास हाडांची झीज भरून निघेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 08:04 AM
तरुण वयातच गुडघ्यांमधून उठता-बसता कटकट आवाज येतो? मग दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ, हाडांना मिळेल भरून पोषण

तरुण वयातच गुडघ्यांमधून उठता-बसता कटकट आवाज येतो? मग दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ, हाडांना मिळेल भरून पोषण

Follow Us
Follow Us:

हाडांमध्ये वेदना वाढण्याची कारणे?
तरुण वयात हाडांमधून आवाज का येतो?
हाडांची झीज भरून काढण्यासाठी उपाय?

बदललेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, व्यायामाचा अभाव आणि पोषक घटकांची कमतरता इत्यादी गोष्टींमुळे शरीरातील हाडे कमकुवत होऊन जातात. तरुण वयात हाडांची झीज झाल्यामुळे हाडे कमकुवत होऊन उठल्यानंतर किंवा खाली बसल्यानंतर हाडांमधून कटकट आवाज येण्यास सुरुवात होते. पूर्वीच्या काळी शरीराला वयाच्या ६० व्या वर्षानंतर आजारांची लागण व्हायची, मात्र हल्ली बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच शरीराची गंभीर आजारांची लागण होते आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. उठता-बसताना गुडघ्यातून कडकड किंवा कटकट येण्यास सुरुवात झाल्यानंतर अतिशय सामान्य लक्षणे समजून दुर्लक्ष केले जाते, पण असे न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Migraine: कडाक्याच्या उन्हात मायग्रेनचा त्रास वाढतोय? ‘हे’ प्रभावी उपाय देतील आराम

हाडांसंबंधित आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. हाडांची झीज झाल्यानंतर हाडांमध्ये वेदना तर काहीवेळा हाडांमधून कटकट आवाज येण्यास सुरुवात होते. हाडांमधील कमी झालेले कॅल्शियम भरून काढण्यासाठी विविध सप्लिमेंट्स, कॅल्शियम युक्त गोळ्या आणि इतर पदार्थांचे सेवन केले जाते. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी एक ग्लासभर दुधात चिमूटभर हा पदार्थ मिक्स करून प्यायल्यास हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यासोबतच आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील.

हाडांमध्ये वाढलेला ठिसूळता आणि झीज भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.यामुळे हाडांमधून येणारा कटकट आवाज कमी होईल आणि हाडे मजबूत होण्यास मदत होईल. यासाठी एक ग्लासभर दुधात सुंठ पावडर, दालचिनी पावडर आणि चिमूटभर हळद मिक्स करून प्यावी. दूध तयार करण्यासाठी एक ग्लासभर दूध टोपात गरम करण्यासाठी ठेवा. उकळी आलेल्या दुधात सुंठ पावडर, चिमूटभर हळद आणि दालचिनी पावडर टाकून ५ ते ७ मिनिट उकळवून घ्या. उकळी आल्यानंतर दूध गाळून थंड होण्यासाठी ठेवा.

Vitamin B12: सतत थकवा जाणवतोय? असू शकतं Vitamin B12 च्या कमतरतेचे संकेत; जाणून घ्या लक्षणे

विविध मसाले घालून बनवलेले दूध चवीला अतिशय सुंदर लागते आणि शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. रात्री झोपण्याआधी नियमित दुधाचे सेवन केल्यास गुडघ्यांमध्ये वाढलेला वेदना कमी होण्यासोबतच हाडांची झीज भरून निघेल. सुंठ हे आयुर्वेदिक वेदनाशामक म्हणून ओळखले जाते. यामध्ये असलेले टी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म गुडघ्यांमधील अंतर्गत सूज झपाट्याने कमी करतात. तसेच दालचिनीच्या सेवनामुळे हाडांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक हाडांची झीज रोखते आणि आतून नैसर्गिक पोषण देण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित मसाले घालून तयार केलेले दूध प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुण वयात गुडघ्यांमध्ये कटकट आवाज का येतो?

    Ans: कॅल्शियम, व्हिटॅमिन D ची कमतरता, कमी शारीरिक हालचाल, चुकीची बसण्याची पद्धत किंवा सांध्यांवरील ताण यामुळे अशी समस्या उद्भवू शकते.

  • Que: हाडांच्या मजबुतीसाठी दुधासोबत कोणते पदार्थ उपयुक्त ठरू शकतात?

    Ans: दुधासोबत खजूर पावडर, बदाम, हळद किंवा तीळ यांचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने पोषणमूल्य वाढू शकते.

  • Que: कॅल्शियमची कमतरता गुडघ्यांच्या आरोग्यावर परिणाम करते का?

    Ans: होय. कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होऊ शकतात आणि सांध्यांशी संबंधित तक्रारी वाढू शकतात.

Web Title: At a young age do you get a cracking sound from your knees then mix it with milk and drink this substance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • strong bones

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
4

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.