
रात्रीच्या जेवणानंतर अजिबात करू नका 'या' चुका, अन्यथा उद्भवतील पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता वाढून शरीराचे होईल नुकसान
बद्धकोष्ठता वाढण्याची कारणे?
पचनक्रिया कशामुळे बिघडते?
जेवणानंतर कोणत्या चुका टाळाव्यात?
आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. वारंवार विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. दिवसभर कामाच्या धावपळीमध्ये व्यवस्थित जेवण करायला वेळ मिळत नाही. पण रात्रीच्या जेवणात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते, तर काहींना जेवण वेगवेगळे चमचमीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण अतिप्रमाणात खाल्लेले तिखट, तेलकट पदार्थ शरीराला हानी पोहचवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर कोणत्या चुका करू नयेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चुका केल्यास बद्धकोष्ठता किंवा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
जेवल्यानंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते. पण असे करू नये. यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच लगेच झोपल्यामुळे ऍसिड रिफ्लेक्सची समस्या वाढते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय पोट खराब होऊन खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. रात्रीच्या वेळी उशिरा जेवण केल्यास पचनास जड असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही आणि सतत आंबट ढेकर येतात. याशिवाय वारंवार जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यास मधुमेह किंवा शरीरसंबंधित इतर आजारांचा धोका वाढू शकतो.
जेवणानंतर जड व्यायाम केल्यास अन्नपदार्थ पचन होण्यास अडथळे निर्माण होतात. जेवल्यानंतर १० ते १५ मिनिटं हलका व्यायाम केल्यास पचनक्रिया बिघडते. आपल्यातील अनेकांना जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीच्या सेवनामुळे शरीर खराब होण्यासोबतच झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवणाच्या ५ तास आधी चहा किंवा कॉफीचे अजिबात सेवन करू नये.
जेवणानंतर लगेच झोप येत असल्यास १० ते १५ चालावे. यामुळे तब्येतीला हानी पोहचत नाही. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी बडीशेप किंवा मुखवास खावा. यामुळे तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होतात. पचनक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत आणि आतड्यांमध्ये तसेच साचून राहतात. त्यामुळे जेवणाच्या ३ तासानंतर झोपावे.
Ans: जेवणानंतर लगेच झोपणे, धूम्रपान करणे, जास्त गोड पदार्थ खाणे, अतिप्रमाणात पाणी पिणे, तीव्र व्यायाम करणे आणि उशिरापर्यंत जागरण करणे टाळावे.
Ans: अॅसिडिटी, अपचन, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि पचनक्रिया मंदावण्याची शक्यता वाढू शकते.
Ans: होय. जेवणानंतर 10–15 मिनिटे संथ गतीने चालल्याने पचन सुधारण्यास, रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास आणि पोट हलके वाटण्यास मदत होऊ शकते.