'टाटा'च्या संशोधनाला जागतिक मान्यता! केमोथेरपीत पपईच्या पानांचा अर्क प्रभावी ठरल्याचे निष्कर्ष
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीराची कॅन्सरची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य कायमच बिघडून जाते आणि शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. काहींचा आजार वर्षभरात बरा होतो तर काहींना ३ ते ४ वर्षांइतका वेळ आजारातून बाहेर पडण्यासाठी लागतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)
केमोथेरपीदरम्यान प्लेटलेट्सची संख्या घटल्याने अनेक कर्करोग रुग्णांना उपचार पुढे ढकलण्याची किंवा औषधांचा डोस कमी करण्याची वेळ येते. मात्र, या गंभीर समस्येवर पपईच्या पानांचा अर्क हा सुरक्षित, किफायतशीर आणि प्रभावी सहाय्यक पर्याय ठरू शकतो, असे टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबई यांच्या फेज-३ वैद्यकीय अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित जेसीओ ग्लोबल ऑकॉलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले असून, कर्करोग रुग्णांमध्ये पपईच्या पानांच्या अर्काच्या वापराला भक्कम वैज्ञानिक आधार मिळाला आहे.
या अभ्यासात केमोथेरपीमुळे प्लेटलेट्स कमी झालेल्या २१९ सॉलिड ट्यूमर रुग्णांचा समावेश करण्यात आला. नियमित उपचारांसोबत पपईच्या पानांचा अर्क देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची संख्या अधिक वेगाने वाढल्याचे आढळले. तसेच केमोथेरपी पुढे ढकलण्याचे आणि औषधांचा डोस कमी करण्याचे प्रमाणही घटले. विशेष म्हणजे या उपचाराशी संबंधित कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत. संशोधकांच्या मते, हा अर्क परवडणारा आणि सहज उपलब्ध असल्याने विशेषतः भारतासारख्या कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील कर्करोग रुग्णांसाठी तो मोठा दिलासा ठरू शकतो.
पपईच्या पानांचा अर्क प्लेटलेट्सची पुनर्प्राप्ती वेगाने करून रुग्णांना उपचारात अनावश्यक खंड न पडता केमोथेरपी सुरू ठेवण्यास मदत करू शकतो. हा परवडणारा पर्याय विशेषतः विकसनशील देशांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असे मत डॉ. विकास ओस्तवाल,प्रमुख संशोधक, टाटा स्मारक केंद्र यांनी मांडले आहे. हे संशोधन म्हणजे सर्रास वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक उपायाचे तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय संशोधनातून सिद्ध केले आहे. टाटाच्या संशोधकांनी पुरावा सादर केला असल्याने केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील कर्करोग रुग्णांना फायदा होऊ शकतो, असे डॉ. सुदीप गुप्ता, संचालक म्हणाले.
Dengue: पावसाळ्यात वाढतो डेंग्यूचा धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; जाणून घ्या
पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा प्रभावी संगम घडवून आणणाऱ्या या संशोधनामुळे पुराव्यावर आधारित सहाय्यक उपचारांचा नवा मार्ग खुला झाल्याचे मानले जात आहे.
२१९ रुग्णांवरील फेज-३, ट्रिपल ब्लाइंड, प्लेसिबो-नियंत्रित अभ्यासात सकारात्मक निष्कर्ष.
प्लेटलेट्सची जलद वाढ: केमोथेरपीतील विलंब आणि डोस कमी करण्याची गरज घटली.
Ans: संशोधनानुसार पपईच्या पानांचा अर्क काही रुग्णांमध्ये केमोथेरपीदरम्यान प्लेटलेट्सची संख्या टिकवून ठेवण्यास किंवा वाढण्यास मदत करू शकतो. मात्र हा उपचाराचा पर्याय नसून पूरक स्वरूपातच वापरला जातो.
Ans: नाही. सध्या उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यानुसार पपईच्या पानांचा अर्क कॅन्सरवर उपचार म्हणून मान्य नाही. तो केवळ काही दुष्परिणाम कमी करण्यासाठी किंवा सहाय्यक उपचार म्हणून अभ्यासला जात आहे.
Ans: नाही. कोणतेही हर्बल किंवा नैसर्गिक पूरक पदार्थ सुरू करण्यापूर्वी ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण काही पदार्थ औषधांशी परस्परसंवाद करू शकतात.






