वाढलेले वजन क्षणात जाईल आत, रोज एक किलो वजन होईल कमी; बाबा रामदेव यांनी सांगितले डाएटमध्ये कोणत्या गोष्टीचे सेवन करावे
लठ्ठपणाची समस्या आजकाल सर्वांनाच भेडसाळू लागली आहे. चुकीची लाइफस्टाइल, अनहेल्दी पदार्थांचे सेवन आणि व्यायामाचा अभाव ही त्याची कारणे आहेत. अनेकदा कामाच्या गडबडीत आपल्याला जेवणासाठीची फारसा वेळ मिळत नाही अशात आपण बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाऊ लागतो. कोणत्या पार्टीमध्ये गेलो तर तिथे कोल्ड ड्रिंक्स, तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. सतत अशा अनहेल्दी पदार्थांचे सेवन करूनही आपले वजन आणि पोटावरची अतिरिक्त चरबी वाढत असते. लठ्ठपणा फक्त शरीराचा आकार वाढवत नाही तर यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढत असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या समस्यांसाठी लठ्ठपणा हा एक जोखीम घटक आहे. लठ्ठपणा हा आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नसून, वेळीच या समस्येवर योग्य ते उपाय केले पाहिजेत. दररोज व्यायाम आणि खाण्या-पिण्यातील पदार्थांमध्ये काही बदल करून आपण आपले वजन सहज कमी करू शकतो.
वजन कमी करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सोशल मीडियावर काही टिप्स शेअर केल्या आहेत. व्हिडिओमध्ये बाबा रामदेव सांगत आहेत की कोणत्या गोष्टी खाल्ल्याने आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून दररोज वजन कमी करता येते. चला त्यांनी काय सांगितले ते सविस्तर जाणून घेऊया.
बाहेरच अन्न आणि जास्त गोडाचे पदार्थ टाळा
बाबा रामदेव म्हणाले की, बाहेरचे अन्न खाणे आणि जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते आणि पोट फुगू लागते. यामुळे अनेक आजार होऊ लागतात. अशा परिस्थितीत धान्य, मीठ किंवा गोड पदार्थ खाण्याऐवजी फळे आणि भाज्यांचा आहार घेता येईल. बाबा रामदेव म्हणतात की असे केल्याने शरीर आत असलेल्या अतिरिक्त चरबीचा अन्न स्रोत म्हणून वापर करू लागते.
योग करा, भाज्या खा
दररोज वजन कमी करण्याबाबत बाबा रामदेव यांनी सांगितले की , रोज थोडे थोडे वजन कमी करता येते. जर तुम्ही योग, आयुर्वेद आणि आहाराकडे लक्ष दिले तर वजन कमी होण्यास सुरुवात होते. तुमच्या आहारात सॅलड, खरबूज आणि टरबूज यांचा समावेश करा. यासोबतच उकडलेल्या भाज्या खा. असे केल्याने वजन झपाट्याने कमी होते. आहारासोबतच, आपण जर आपल्या दिनचर्येत योग आणि व्यायामाचा समावेश केला तर आपले वजन लवकर कमी होऊ शकते.
भोपळ्याचा रस
भोपळ्याची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? भोपळ्याचा रस पिल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. फायबरने समृद्ध भोपळ्याच्या रसात फायदेशीर गुणधर्म असतात जे पचनक्रियेला सुधारण्यास मदत करतात.यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे शरीराला हायड्रेशन मिळते. हा रस शरीराला डिटॉक्स करून त्याला शरीराला शुद्ध करण्यास मदत करतो. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्यापासूनही आराम मिळतो. एवढेच काय तर भोपळ्याच्या रसाचा त्वचेवरही उत्तम परिणाम दिसून येतात, याचे नियमित सेवन केल्याने आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते.
अश्वगंधा
अश्वगंधा हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे याचे आरोग्याला अनेक फायदे होत असतात. यात औषधी गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, त्यांचे सेवन करताच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अश्वगंधाचे फायदे ताण कमी करण्यात आणि शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यात दिसून येतात. अश्वगंधाची पाने चघळल्याने वजन कमी करण्यावर मोठा परिणाम दिसून येईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.