(फोटो सौजन्य: istock)
हाय कोलेस्ट्रॉल हा आजार आजकाल अनेकांना भेडसाळत आहे. याला सायलंट किलर असेही म्हटले जाते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची ही समस्या आता जवळजवळ सामान्य झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, याची लक्षणे वेळीच ओळखली नाही तर तुमच्यासाठी हे प्राणघातक ठरू शकते. याची विशिष्ट अशी लक्षणे नाही आहेत मात्र जसजशी याची पातळी वाढत जाते आपल्या पायांमध्ये एकही बदल घडून येतात. हे बदल निश्चितच कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत देत असतात, ज्यांना ओळखून तुम्ही वेळीच सतर्क राहणे फार महत्त्वाचे आहे.
कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयरोगांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, लोक स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा, व्यायाम किंवा फिरायला जाणे पसंत करतात. तुम्हीही सकाळी मुलांना आणि मोठ्यांना चालताना पाहिले असेल. जर तुम्हाला चालताना तुमच्या शरीरात काही लक्षणे दिसली तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण याचा अर्थ तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे असा असू शकतो. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास आपल्या पायांत कोणते बदल दिसून येतात हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
सुन्नपणा
जर तुम्हाला पायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्नपणाची समस्या वारंवार येत असेल तर समजून घ्या की रक्ताभिसरण खराब आहे. खरं तर, जेव्हा कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये जमा होते तेव्हा ते रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करू लागते. यामुळे पायांपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. जर ही समस्या वाढली तर याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
पायांचे थंड होणे
जर रक्ताभिसरण व्यवस्थित झाले नाही तर आपले पाय थंड पडू शकतात. हे विशेषतः चालताना किंवा त्यानंतरही होऊ शकते.
पायांमध्ये वेदना
चालताना जर तुमचे पाय अचानक दुखू लागत असतील तर हे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होत असण्याची शक्यता वर्तवत असते. जेव्हा रक्तप्रवाह प्रभावित होतो तेव्हा कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत आहे? मग आजच आहारात करा ‘या’ 5 बियांचा समावेश
पायांचा रंग बदलणे
तुमच्या पायांचा रंग बदलत असेल तर तुम्ही सावध राहीले पाहिजे. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे पायांची त्वचा पिवळी किंवा निळी होऊ शकते. पायांवर पुरळ किंवा डाग देखील दिसू शकतात. तुम्हालाही तुमच्या पायांवर जर ही लक्षणे जर जाणवत असतील ते वेळीच हॉस्पिटल गाठा आणि यावर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.