अनेकांना कुत्रा,(dog) (cat) मांजर हे आवडीने पाळतात. लोकं कुत्र्यांची खूप काळजी घेतात. त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतात. म्हणूनच आपण जे खाऊ ते त्याला खायला देतात. पण तज्ज्ञांच्या मते, पाळीव प्राण्यांना आपल्याप्रमाणे खाऊ घालणे टाळले पाहिजे. कुत्र्याच्या शरीरातील अंतर्गत पचनसंस्था आणि एन्झाईम्स माणसांप्रमाणे नसतात, त्यामुळे आपण खातो ते पदार्थ पाळीव प्राण्याच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कुत्र्याला प्रेमाने काहीही खायला देताना त्याच्या तब्येतीचा विचार करणे गरजेचे आहे. आपण जे पदार्थ जे खाऊ शकतो, त्यांने कुत्र्याना हानी निर्माण होऊ शकते.
लसूण, नुसती लसूण कुत्र्यांना खायला देणे हानीकारक ठरू शकते. लसणीत थायोसल्फेट असते. त्यामुळे रक्त पेशींवर परिणाम होऊ शकतो. चॉकलेट अनेक लोकं कुत्र्यांना आवडीने चॉकलेट खायला घालतात. चॉकलेट कुत्र्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. ते कुत्र्यांसाठी विष असते. त्यामुळे कुत्र्याला अजिबात चॉकलेट खायला देऊ नये. कॉफी -काहीजण कुत्र्याला कॉफी प्यायल्याही देतात. त्यात कॅफीन असते. कुत्र्यांच्या आरोग्यासाठी कॅफीन हानीकारक आणि विषयुक्त रसायन मानले जाते. कॉफी पिऊन कुत्र्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. परिणामी कुत्र्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
मोहरी- नेहमीचे पदार्थ कुत्र्यांना खायला देतात त्यात मोहरी नसेल असा प्रयत्न करावा. कुत्र्यांसाठी मोहरी चांगली नाही. त्यात विषारी संयुगे असतात. त्यामुळे कुत्र्यांना स्ट्रोएन्टेरिटिस होऊन त्यांच्या पोटाला सूज येते. त्यामुळे कोणतेही पदार्थ देताना सांभाळूनच.चहा- चहा केल्यानंतर त्याची पावडर आपण फेकून देतो. पण काहीवेळा चुकून कुत्रे ही चहा पावडर खातात. असं खाल्ल्यानंतर त्यांना खाज सुटते शिवाय त्वचेच्या समस्या वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्या त्वचेवर परिणाम होतो तो वेगळाच. शिवाय त्यांना खोकलाही येऊ शकतो.
त्यामुळे चहा(tea) पावडर जनावरांसाठी विष आहे.द्राक्षे, मनुका- द्राक्षे किंवा मनुका खाल्ल्याने कुत्र्याच्या मूत्रपिंडावर परिणाम होतो, त्यामुळे त्यांना मनुका खायला अजिबात देऊ नका, यामुळे पोट (tummy) खराब होऊ शकते. तसेच इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
ॲव्होकाडो- माणसांच्या आहारात (food) ॲव्होकाडो खाल्ल्याने अनेक फायदे दिसून येतात. पण कुत्र्यांसाठी ते चांगले नाही. हे कुत्र्यांसाठी विषारी ठरू शकते. त्यामुळे त्यांच्यात आतड्यांसबधी समस्या निर्माण होतात. कच्चे मांस किंवा मासे- कच्च्या अंड्याप्रमाणेच मांस किंवा माश्यात विषाणू असतात. त्यामुळे अन्नाची विषबाधा होऊ शकते. सॅल्मन, ट्राउट, शेड किंवा स्टर्जन सारखे काही मांसे खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होते. उलट्या, ताप येतो (fever). त्यामुळे हे मासे(fish) त्यांना खायला देणार असाल तर ते मासे नीट शिजवा.






