
जो प्रयत्न करतो, तोच विजय मिळवतो...! आयुष्यात आत्मविश्वास आणि सकारात्मकता देणारे सुंदर प्रेरणादायी विचार
जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला नवनवीन संकटांचा आणि आव्हानांचा सामना करावा. काहीवेळा ही संकट खूप मोठी असतात. संकट आल्यानंतर रडत न बसता जिद्दीने आणि चिकाटीने त्यावर मात करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे जीवन कायमच सकारात्मकतेने आणि आनंदाने जगण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर एक सुंदर हसू असणे फार आवश्यक आहे. कारण दुःख प्रत्येक व्यक्तीला असतात. त्या दुःखांवर मात करून विजय मिळवणे फार आवश्यक आहे. स्वतःच्या विचारांशी आणि निर्णयांशी पक्की असणारी माणसं आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगात खंबीरपणे उभी राहू शकतात. म्हणूनच आयुष्यात भरपूर यश आणि नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी हे प्रेरणादायी विचार नक्की वाचा.(फोटो सौजन्य – istock)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ अनमोल विचार जीवन जगताना देतील प्रेरणा …
तुमची स्वप्ने काय आहेत ते कधीही विसरू नका. स्वप्नेच तुम्हाला जगण्याचे बळ देतात.
यशस्वी आणि अयशस्वी लोकांच्या क्षमतेमध्ये फार फरक नसतो. त्यांच्या क्षमता वाढवण्याच्या इच्छेमध्ये फरक असतो.
तुम्ही जितके निरागस असाल तितकीच तुमची ताकददेखील जास्त असते. निरागसता तुम्हाला यश मिळण्यासाठी उपयुक्त ठरते.
जेव्हा जग म्हणत असेल की तुम्ही एखादे काम करु शकत नाही तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर चालला आहात.
जर तुमचा वर्तमानकाळ तुमच्या भूतकाळापेक्षा चांगला नसेल तर तुम्ही तुमचे आयुष्य पुढे नेण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
फक्त तुमच्याच आयुष्यात संघर्ष आहे असे समजू नका. इतिहासाची पाने चाळलीत तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे.
जेव्हा कर्म करताना तुमच्या मनात फळाची अपेक्षा डोकावत नसेल तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर चालला आहात.
उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका
तुम्ही यशस्वी झालात किंवा अयशस्वी असाल तरी लोक तुम्हाला त्रास देणे थांबवणार नाहीत.
जे तुम्ही आनंदाने शिकता ते तुम्ही आयुष्यात कधीही विसरत नाही.
“तुमची आजची मेहनत, उद्याचे नशीब ठरवते.”
“प्रयत्न करणे कधीही सोडू नका, अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे.”
“अशक्य असे काहीच नाही.”
“दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यापेक्षा स्वतःची पाऊलवाट निर्माण करा.”
“ध्येय आणि चिकाटी यशाची शिखरे सर केल्याशिवाय राहत नाही.”
“स्वतःला इतकं घडवा की तुम्हाला सोडणाऱ्याला पश्चात्ताप झाला पाहिजे.”
“यशस्वी होण्यासाठी सातत्य ठेवा.”
प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर…! स्वप्नांना बळ देण्यासाठी …
“जेव्हा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा स्वतःवर ठाम राहा – हेच खरे यशाचे रहस्य आहे.”
स्वप्नं ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्नं ती असतात जी झोपू देत नाहीत.
यशाची गुरुकिल्ली म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे. हार मानणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही.
अडचणी आयुष्यात येतात, पण त्या आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच येतात.