उन्हाळ्यामध्ये बाजारात लिंबाना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. कारण गर्मीच्या दिवसांमध्ये घरात किंवा बाहेर गेल्यानंतर लिंबू सरबत प्यायले जाते. लिंबू सरबत प्याल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हामुळे संपलेली उष्णतेची कमतरता भरून काढण्यासाठी लिंबू सरबताचे सेवन करावे. लिंबू पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे रक्षण होते. लिंबूमध्ये विटामिन सी असते, जे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित लिंबू पाण्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास वाढण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्रभावी आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. पण लहान मुलांना लिंबू पाणी द्यावी की नाही? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला देखील पडला असेल ना. चला तर जाणून घेऊया आरोग्य आहार आणि पोषण क्लिनिकच्या आहारतज्ञ डॉ. सुगीता मुत्रेजा यांचा सल्ला.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांना लिंबू पाणी द्यावे का?
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लिंबू पाणी आवडते. पण लहान मुलांना लिंबू पाणी द्यावे की नाही असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. लिंबू पाण्यात विटामिन सी असल्याने लहान मुलांना लिंबू पाणी दिल्यास त्यांचे पोट जड होऊ शकते. त्यामुळे लहान वयात मुलांना लिंबू पाणी देऊ नये.ज्यावेळी तुमचे बाळ एक वर्षाचे होईल तेव्हा तुम्ही त्यांना लिंबू सरबत देऊ शकता. लहान वयात जर मुलांना लिंबूपाणी दिले तर त्याच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
[read_also content=”शरीराला द्या बर्फासारखा थंडावा, घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये वेलचीचे सरबत https://www.navarashtra.com/lifestyle/make-cardamom-juice-at-home-in-easy-way-545647.html”]
लहान मुलांना लिंबू पाणी देण्याचे फायदे:
[read_also content=”घरात शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून ५ मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत ब्रेड डोसा, वाचा सोपी रेसिपी https://www.navarashtra.com/lifestyle/make-crispy-bread-dosa-in-5-minutes-545544.html”]
लिंबू पाणी पिण्याचे तोटे:
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.