फोटो सोजन्य: iStock
एकीकडे इंधनाच्या किमतीत वाढ होत असतानाच ग्राहक आता पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार्सना भरघोस प्रतिसाद देत आहे. ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत असणारी हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.
भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत असताना MG ZS EVचे नाव वेगाने लोकप्रिय होत आहे. ही प्रीमियम इलेक्ट्रिक SUV केवळ पर्यावरणपूरक नाही, तर आधुनिक फीचर्स, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेफ्टी यांचे अप्रतिम कॉम्बिनेशन देते. याची लोकप्रियता विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते. चला 2025 MG ZS EV ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊयात.
Toyota त्यांची पहिली वाहिली EV लाँच करण्याच्या तयारीत, रेंज 500 किमीपेक्षा जास्त
जुलै 2025 मध्ये MG ZS EV ला 815 नवे ग्राहक मिळाले, जे जुलै 2024 मधील 472 युनिट्सच्या तुलनेत जवळपास 73 टक्के वार्षिक वाढ दर्शवतात. देशांतर्गत बाजारात या SUV ची किंमत 17.99 लाख रुपये ते 20.50 लाख रुपये दरम्यान आहे. ही इलेक्ट्रिक कार एकूण 7 वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.
एमजी ZS EV च्या केबिनमध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम बसविण्यात आले असून त्यामध्ये Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि रिमोट फंक्शन्सची सुविधाही मिळते. त्यासोबतच पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि i-SMART टेक्नॉलॉजीसह Eco, Normal आणि Sport मोड्स असे आकर्षक व आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
GST कमी झाल्यास देशातील सर्वात स्वस्त कारची किंमत किती होईल? छप्परफाड होणार बचत
सुरक्षेच्या बाबतीत, MG ZS EV मध्ये 6 एअरबॅग्स आणि Level-2 ADAS (Advanced Driver Assistance System) उपलब्ध आहे. यामध्ये Adaptive Cruise Control, Lane Keep Assist, Blind Spot Monitoring आणि Autonomous Emergency ब्रेकिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत. याशिवाय Lane Departure Warning, Emergency Lane Keep, Lane Change Assist आणि Rear Drive Assist (RDA) यांसारखे अतिरिक्त सेफ्टी फीचर्सदेखील मिळतात.