१४० देशात भ्रमण, ४०० शहरं आणि ३ वर्षं समुद्रावरील आलिशान व्हिलामध्ये वास्तव्य; काय आहे 'हि' गोल्डन पासपोर्ट योजना? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Asiana in the Sea cruise : आजच्या काळात प्रत्येकजण जगभर प्रवास करण्याचं स्वप्न बाळगतो. पण वेळ, पैसा आणि संधी यामुळे अनेकांची ही स्वप्नं अधुरी राहतात. मात्र, आता एक क्रूझ कंपनीने तुमच्यासाठी अशी सुवर्णसंधी दिली आहे की ज्यामुळे तुम्ही ३ वर्षं सातत्याने जगभर फिरू शकणार आहात. ही ऑफर फक्त प्रवासापुरती नाही, तर ती तुमच्या संपूर्ण जीवनशैलीला नवी दिशा देणारी आहे. ‘Villa Vie Residences Cruise’ या कंपनीने “आशियाना इन द सी” (Aashiana in the Sea) नावाचा अनोखा कार्यक्रम सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना “गोल्डन पासपोर्ट” मिळेल. या पासपोर्टमुळे तुम्ही १४० देश आणि ४०० हून अधिक शहरांचा आनंद घेऊ शकाल.
कंपनीने ही योजना विशेषतः निवृत्त आणि जग पाहण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी आणली आहे. प्रवाशांना क्रूझवर एक स्थायी घरासारखी व्यवस्था मिळेल. त्यात जेवण, कपडे धुणे, घरकाम, मनोरंजन, इंटरनेट अशा सर्व सुविधा समाविष्ट आहेत. एवढंच नाही तर जेवणासोबत वाइन किंवा बिअरची मजाही उपलब्ध असेल. यातलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे, एकदा “गोल्डन पासपोर्ट” घेतला की तुम्हाला कोणतेही लपलेले शुल्क, पोर्ट टॅक्स किंवा अतिरिक्त फी भरावी लागणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अविश्वसनीय! कोस्टा रिका किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला ‘ऑरेंज शार्क; शास्त्रज्ञांनी दिले अनोखे स्पष्टीकरण
गोल्डन पासपोर्टसाठी तुम्हाला ८७ लाख रुपयांपासून (USD 99,999) खर्च करावा लागेल. प्रत्येक प्रवासाचा कालावधी साधारण ३ ते ३.५ वर्षांचा असेल. दरम्यान, प्रत्येक बंदरावर जहाज २ ते ३ दिवस थांबेल, ज्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणाची ओळख करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
या योजनेत वयाच्या गटांनुसार किंमत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
९० वर्षांवरील लोकांसाठी पासपोर्ट ९९,००० डॉलर्समध्ये उपलब्ध.
५५ ते ६० वयोगटासाठी सर्वात महाग पर्याय आहे, ज्याची किंमत जवळपास ३ लाख डॉलर्स (₹२.५ कोटी) आहे.
प्रवाशांसाठी क्रूझमध्ये विविध श्रेणीचे आलिशान व्हिला उपलब्ध आहेत:
इनसाईड व्हिला – $129,999 पासून सुरू
पोर्टहोल व्हिला – $149,999 पासून सुरू
ओशन व्ह्यू व्हिला – $169,999 पासून सुरू
बाल्कनी व्हिला – $329,999 पासून सुरू
डिलक्स बाल्कनी व्हिला – $379,999 पासून सुरू
व्हिला सुइट – $439,999 पासून सुरू
credit : social media
या व्हिलामध्ये आलिशान सुविधा, समुद्राचे सुंदर दृश्य आणि लक्झरी हॉटेलसारखा अनुभव मिळेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स
कंपनी प्रवाशांना दरवर्षी मोफत वैद्यकीय तपासणी करून देईल. निवृत्तीनंतर आरोग्याबद्दलची काळजी महत्त्वाची ठरते आणि ही सेवा गोल्डन पासपोर्टला अधिक आकर्षक बनवते.
व्हिला व्ही रेसिडेन्सेसचे सीईओ कॅथी व्हिलाल्बा म्हणतात “आयुष्य झपाट्याने पुढे जातं. बहुतेक लोकांना निवृत्तीनंतर एकच खंत राहते. जगभर प्रवास करण्याची संधी गमावली. गोल्डन पासपोर्टमुळे हे स्वप्न आता शक्य होतंय.” ३ वर्षं क्रूझवर राहत जगभर फिरणं हे अनेकांसाठी आयुष्यभराचं स्वप्न असतं. ‘Villa Vie Residences‘ ची ही ऑफर त्या स्वप्नाला साकार करण्याची एक सुवर्णसंधी आहे. निवृत्त लोकांसाठी तर हा खरोखरच नवा “जीवनप्रवास” ठरू शकतो.