राघवी बिष्ट(फोटो-सोशल मीडिया)
India A vs Australia A : सध्या भारत अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ संघाच्या महिला संघांमध्ये चार दिवसांचा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली असून भारतीय संघ सामन्यात मजबूत स्थितीत अस्लयचे दिसत आहे. आज म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ संपलाअ आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर एकूण २५४ धावांची आघाडी घेऊन सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
भारतीय संघाने मिळवलेल्या आघाडीत राघवी बिष्ट आणि शेफाली वर्मा यांचे मोठे योगदान आहे. या दोन्ही फलंदाजांनी त्यांचे अर्धशतकं झळकवली आहेत. राघवी बिष्टने पहिल्या डावात ९३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिने दुसऱ्या डावात देखील शानदार फलंदाजी करत ८६ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, शेफाली वर्माने ५२ धावांची खेळी केली आहे. या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे, भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर ८ गडी गमावून २६० धावा उभ्या केल्या आहेत. यासह भारताने २५४ धावांची आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पहिल्या डावात २९९ धावा केल्या होत्या. शेफाली वर्माने ३५, राघवी बिश्तने ९३, राधा यादवने ३३, जोशिता ५१, मिन्नू मणीने २८ आणि तितस साधू यांनी २३ धावा केल्या होत्या. ब्राउन आणि जॉर्जिया यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर सिएना जिंजर, लिली मिल्स, एमी एडगर आणि एला हेवर्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सिएना जिंजरच्या १०३ धावा आणि निकोल फाल्टमच्या ५४ धावांच्या जोरावर ३०५ धावा करून भारतावर ६ धावांची नाममात्र आघाडी घेतली होती. यावेळी भारताकडून तितस साधू, जोशिता आणि तनु श्री यांनी प्रत्येकी १ बळी घेतले, तर सयम ठाकोरने ३, राधा यादव आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
हेही वाचा : भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली..
इंडिया अ महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियामध्ये शानदार कामगिरी करत आहे. भारतीय संघाने अनधिकृत कसोटीपूर्वी आयोजित एकदिवसीय मालिका जिंकली आहे. हे भारतीय संघासाठी चांगले संकेत मानले जात आहेत. महिला संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक खेळाडू २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग आहेत. विश्वचषकासाठी निवडलेले सदस्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत येताच संघात सामील होणार आहेत.