चहा पिण्याचे नुकसान (फोटो सौजन्य - iStock)
‘चहाशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही’, ‘चहा नसेल तर मला काही सुचत नाही’, ‘दुपारचे ३ वाजले की चहा नसेल तर मला काहीच काम करता येत नाही’ अशी आणि अनेक वाक्य आपल्या कानावर पडत असतात. एकामागोमाग चहा रिचवणारे आपल्या आजूबाजूला कमी नाहीत. पण तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की दुधाचा चहा सतत पिण्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही मर्यादेत दुधाचा चहा प्यावा.
काही लोक दिवसातून अनेक वेळा दुधाचा चहा पितात. जर तुम्ही तुमची ही सवय वेळीच सुधारली नाही तर काही आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सतत तुम्ही दिवसातून ५-६ कप चहा पित असाल तर तुम्हाला काही आजारांचा विळखा नक्कीच बसू शकतो. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
डिहायड्रेशनचा धोका
सतत चहा पिण्याने होऊ शकते डिहायड्रेशन
उन्हाळ्यात चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही कडक उन्हात सतत चहा प्यायलात तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या येऊ शकते. याशिवाय, जास्त चहा पिण्यामुळे तुमच्या शरीरात लोहाची कमतरतादेखील उद्भवू शकते. जर तुमच्या शरीरात आधीच लोहाची कमतरता असेल तर तुम्ही चहा पिणे टाळावे. चहा तर पितच आहात आणि पाणीही कमी पित असाल तर तुम्हाला कायमच्या डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
सतत चहा पिण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध, जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
पोटाच्या समस्या
चहामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात
जास्त चहामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही चहा पिऊ नये नाहीतर तुमची समस्या वाढू शकते. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की जास्त चहा पिल्याने रक्तदाबदेखील वाढू शकतो, म्हणजेच जास्त चहा तुमच्या हृदयाच्या आरोग्यालादेखील हानी पोहोचवू शकतो. चहा सतत पिण्याने छातीत जळजळ, पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होतात
अनिद्रेची समस्या
झोप न लागण्याचाही होतो परिणाम
चहा पिण्याने तुमच्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जास्त चहा पिणाऱ्या लोकांना निद्रानाश होऊ शकतो. चहामध्ये असलेले कॅफिन तुमची झोप बिघडवू शकते. एकंदरीत, जर तुम्हाला या आरोग्य समस्या टाळायच्या असतील तर जास्त चहा पिऊ नका. सतत चहा पिणे तुम्हाला काही वयापर्यंत कदाचित समस्या उद्भवणार नाहीत. पण एका ठराविक वयानंतर चहाची ही सवय तुमचा जीवही घेऊ शकते. ही गोष्ट तुम्ही दुर्लक्षित केली तर यमराजाची नक्कीच लवकर भेट होईल!
दिवसभरात किती वेळा चहा पिणे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.