
Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
Benefits Of Amla Powder: धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराची काळजी घेण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, झोपेच्या वेळांमध्ये सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर दिसू लागल्यानंतर आजारपणात वाढ होते. त्यामुळे आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आवळा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पण कामाच्या धावपळीमध्ये आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ करणे किंवा रस तयार करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी बाजारात सहज उपलब्ध असलेल्या आवळ्याच्या पावडरचा वापर करावा. (फोटो सौजन्य – istock)
Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
आवळा वाळवून कडक सुकवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून पावडर तयार करा. तयार केलेली पावडर हवा बंद डब्यात भरून ठेवा. आवळ्यामध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक सुद्धा असतात. त्यामुळे नियमित एक चमचा पावडर पाण्यात मिक्स करून प्यावी. पण आवळा वाळवताना आणि पावडर तयार करताना त्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आवळ्याची पावडर बनवताना योग्य ती काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया आवळा पावडरचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे.
आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेणे फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात चमचाभर आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आवळ्याची चव तुरट आणि आंबट असल्यामुळे सुरूवातीच्या वेळी अर्धा चमची एवढ्या प्रमाणात आवळा पावडरचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यास मदत होते. पण पोट संवेदनशील असल्यामुळे आम्लपित्त, मळमळ किंवा जुलाब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याएआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.
केसांच्या निगेसाठी वाढीसाठी आवळा पावडर अतिशय प्रभावी ठरते. आवळा पावडर पाण्यात मिक्स करून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावल्यास केसांची वाढ, केसगळती कमी, अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. पण आवळा पावडर लावल्यानंतर केसांमध्ये टाळूला खाज, जखमा किंवा जळजळ होत असल्यास आवळा पावडरचा वापर करू नये.
आवळा, शिकेकाई आणि रिठा यांसारख्या पारंपरिक वनस्पतीजन्य घटकांचा वापर केसांच्या स्वच्छतेसाठी केला जातो. केस धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणात किंवा शाम्पूमध्ये सुद्धा आवळा पावडर मिक्स करून लावावी. पारंपरिक वनस्पतीजन्य घटकांचा वापर केसांच्या स्वच्छतेसाठी केल्यास केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल .