Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि स्थलदेवता म्हणजे नेमके काय? शुभकार्यांमध्ये आणि पूजाविधींमध्ये यांचे काय महत्त्व आहे?

आपल्या कुटुंबाची देवता, गावाचे ग्रामदैवत आणि मनापासून पूजली जाणारी इष्टदेवता या संकल्पना एकसारख्या नाहीत. स्थलदेवतेचे महत्त्वही वेगळे आहे. शुभकार्यांमध्ये या 4 देवतांचे स्मरण का केले जाते आणि या परंपरांमागील सांस्कृतिक अर्थ काय आहे, जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 09, 2026 | 08:26 PM
कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि स्थलदेवता म्हणजे नेमके काय? शुभकार्यांमध्ये आणि पूजाविधींमध्ये यांचे काय महत्त्व आहे?
Follow Us
Follow Us:
  • कुलदेवता ही कुटुंबाची परंपरागत आराध्य देवता असून तिची पूजा पिढ्यान्‌पिढ्या केली जाते.
  • ग्रामदेवता गावाच्या सामूहिक श्रद्धेचे प्रतीक, तर इष्टदेवता व्यक्तीच्या वैयक्तिक भक्तीशी संबंधित असते.
  • स्थलदेवतेचे पूजन विशिष्ट जागेशी जोडलेले असून शुभकार्यांमध्ये श्रद्धा आणि कृतज्ञतेला महत्त्व असते.
भारतीय संस्कृतीत कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण करण्याची अतिशय प्राचीन परंपरा आहे. लग्न, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज किंवा नवीन व्यवसायाचीही सुरुवात करताना अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि स्थलदेवता यांचे पूजन केले जाते. तुम्हीही पूजेमध्ये या चार देवतांचे आवाहन करताना ऐकले असावेच. पण या 4 देवतांमधील नेमका फरक काय आणि त्यांचे धार्मिक जीवनात इतके महत्त्व का आहे? चला, जाणून घेऊयात.

कुलदेवता म्हणजे काय?

कुलदेवता ही एखाद्या कुटुंबाची किंवा वंशाची परंपरागत आराध्य देवता मानली जाते. पिढ्यान्‌पिढ्या कुटुंबातील सदस्य ज्या देवतेची श्रद्धेने पूजा करतात, तिला कुलदेवता किंवा कुलदैवत म्हटले जाते. अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवतेचे मूळ मंदिर त्यांच्या पूर्वजांच्या गावात असते. लग्न, मुंज यांसारख्या महत्त्वाच्या संस्कारांपूर्वी कुलदेवतेचे दर्शन घेणे किंवा पूजा करणे ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. यामुळे कुटुंबाची परंपरा आणि पूर्वजांशी असलेले नाते जपले जाते. महाराष्ट्रातील तुळजा भवानी, जेजुरीचा खंडोबा, माहूरगडची रेणुका माता ई. देवतांची मंदिरे बऱ्याच कुटुंबांची कुलदैवते आहेत.

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास

ग्रामदेवता म्हणजे काय?

गावाचे संरक्षण, सुख-समृद्धी आणि सामूहिक कल्याण यांच्याशी ग्रामदेवतेची संकल्पना जोडलेली आहे. ग्रामदेवता ही एखाद्या गावाची किंवा वस्तीची आराध्य देवता असते. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये ग्रामदैवताची यात्रा, जत्रा आणि वार्षिक उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. गावातील संकटे दूर व्हावीत, शेती चांगली व्हावी आणि गावात शांतता नांदावी, अशी प्रार्थना ग्रामदेवतेकडे केली जाते. घरातील शुभकार्यांसाठी शक्यतो लग्नकार्यांसाठी, मुंजकार्यासाठी वगैरे ग्रामदैवतेचे आशीर्वाद नक्की घेतले जातात. महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये लग्नाच्या आधी गावदेवाची प्रथा ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांना लग्नकार्यासाठी आमंत्रण देण्यासाठी मानली जाते.

इष्टदेवता म्हणजे काय?

ज्या देवतेवर एखाद्या व्यक्तीची विशेष श्रद्धा असते आणि जिची ती नियमित उपासना करते, तिला इष्टदेवता म्हणतात. एखाद्याची इष्टदेवता गणपती, शिवमहादेव, विष्णू, देवी, विठ्ठल किंवा अन्य आराध्य देवता असू शकते. इष्टदेवतेची निवड वैयक्तिक श्रद्धा, कौटुंबिक संस्कार किंवा आध्यात्मिक परंपरेनुसार केली जाते. तिचे स्मरण केल्याने मनाला आधार, शांतता आणि सकारात्मकतेची अनुभूती मिळू शकते.

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

स्थलदेवता म्हणजे काय?

विशिष्ट ठिकाणाशी संबंधित असलेल्या देवतेला स्थलदेवता म्हटले जाते. एखादे मंदिर, तीर्थक्षेत्र, घर, शेत किंवा विशिष्ट परिसर यांच्याशी या देवतेची धार्मिक परंपरा जोडलेली असू शकते. नवीन घरात प्रवेश करताना, एखाद्या पवित्र स्थळी धार्मिक विधी करताना किंवा नवीन जागेवर काम सुरू करताना त्या ठिकाणाशी संबंधित देवतेचे पूजन केले जाते. महाराष्ट्रीयन कुटुंबात नरसोबा, म्हसोबा, इत्यांदी देवता त्या त्या भावकी आणि गावकीचे स्थलदेवता असू शकतात. बऱ्याचदा शेतात, रानात, विहिरीच्या शेजारी, माळावर, घाटावरून जाताना, एखाद्या डोंगराशेजारी असणाऱ्या देवतांना आपण स्थलदेवता म्हणू शकतो.

शुभकार्यांमध्ये या देवतांचे महत्त्व

या देवतांचे पूजन हे श्रद्धा, परंपरा आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते. कुलदेवता कुटुंबाच्या परंपरेशी, ग्रामदेवता गावाच्या सामूहिक श्रद्धेशी, इष्टदेवता वैयक्तिक भक्तीशी, तर स्थलदेवता विशिष्ट जागेशी संबंधित असते. प्रत्येक कुटुंबाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते. या परंपरांमुळे कुटुंबातील नाती, सांस्कृतिक वारसा आणि समाजातील एकोपा आदी जपण्यास मदत होते.

Web Title: Kuldevta gramdevta ishtadevata sthaldevata meaning importance worship ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Hindu tradition
  • LIFESTYLE
  • Religion

संबंधित बातम्या

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या
1

Sant Machhindranath: मच्छिंद्रनाथ कोण होते? नाथपंथाची पायाभरणी आणि गोरक्षनाथांशी असलेले गुरू-शिष्य नाते जाणून घ्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
2

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
3

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने रंगली कवितांची मैफल! नभांत नाट्य संस्थेच्या ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
4

‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने रंगली कवितांची मैफल! नभांत नाट्य संस्थेच्या ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.