आल्याचा चहा पिण्याचे फायदे
राज्यभरात सगळीकडे मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरम गरम चहा पिण्याची इच्छा सगळ्यांचं होते. चहा प्यायल्यानंतर फ्रेश आणि उत्साही वाटते. पावसाळ्यामध्ये आल्याचा चहा सार्वधिक घरांमध्ये प्यायला जातो. आल्यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी प्रभावी आहेत. बाजारात मिळणारे आले विकत आणून घरी सुकवल्यानंतर त्याची पावडर तयार केली जाते. ही पावडर चहा बनवताना किंवा काढा बनवताना वापरतात. चवीला तिखट असलेलं आलं आरोग्यासाठी सुद्धा तितकंच फायदेशीर आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आल्याचा चहा प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. तसेच जगभरात अनेक लोकांना मधुमेह हा गंभीर आजार आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्यापेक्षा आल्याचा चहा प्यावा. आल्याचा चहा प्याल्याने वजन नियंत्रणात राहून भूक कमी लागते. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकण्याचे काम आल्याचा चहा करतो.
आल्याचा चहा पिण्याचे फायदे
आल्याच्या चहामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच काहींना सतत सूज येते. ही सूज कमी करण्यासाठी आल्याचा चहा उपयुक्त आहे. आल्याचा चहा सामन्यात ऑस्टियोआर्थराइटिससाठी केला जातो. यामुळे लवकर सूज कमी होऊन शरीर वेदनामुक्त होते.
आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आल्याचा चहा मेंदूला विकृत रोगांपासून वाचवण्यास मदत करतो.
आल्याचा चहा पिण्याचे फायदे
हृदयविकाराच्या समस्येने अनेक लोक त्रस्त झाले आहेत. रक्तदाब समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आल्याचा चहा फायदेशीर आहे. आले उच्च रक्तदाब, रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचा झटका इत्यादी गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी मदत करतो.
कार किंवा बसमध्ये प्रवास करत असताना अनेकदा मोशन सिकनेसचा त्रास जाणवण्यास सुरुवात होते. यावर आल्याचा चहा हा एक उत्तम पर्याय आहे. आल्याचा चहा प्याल्याने मेंदूच्या रिसेप्टरला विरोध करतात ज्या उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात होते. सकाळी उठल्यानंतर नियमित आल्याचा चहा प्यावा.